'काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. आम्हाला कोणत्याही धर्मावर भाष्य करायचे नाही किंवा कोणाच्याही भावना दुखावायच्या नाहीत', अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. डीएमके नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलीन यांचे चीरंजीव उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी सनातन (Sanatana Dharm) धर्माविषयी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ते वृत्तसंस्था एएनआयशी बोलत होते.
'सनातन निर्मूलन परिषदेत' उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरिया आणि मच्छरांसोबत केली. ते म्हणाले काही गोष्टींना विरोध करता येत नाही. त्यामुळे त्या संपवाव्या लागतात. जसेकी कोरोना, डेंग्यू, मलेरिया वगैरे. सनातन धर्माचेही तसेच आहे. त्यामुळे त्यालाही अशाच प्रकारे संपवले पाहिजे. वाचकांच्या माहितीसाठी असे की, उदयनिधी हे सत्ताधारी द्रमुक सरकारमधील युवक कल्याण आणि क्रीडा विकास मंत्री आहेत.
ट्विट
#WATCH | Nagpur: On Tamil Nadu Minister Udhayanidhi Stalin's 'Sanatana Dharma should be eradicated' remark, Maharashtra Congress Chief Nana Patole says, "Congress' stand is clear, we do not want to comment on any religion or to hurt anyone's sentiments..." pic.twitter.com/APlA9cWYaA
— ANI (@ANI) September 3, 2023
उदयनिधी यांच्या वक्तव्यावर भाजपमधून तीव्र प्रतिक्रिया आली आहे. भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी म्हटले आहे की, उदयनिधी यांचे वक्तव्य हे देशातील 80% 80 टक्के लोकांच्या नरसंहाराचे आवाहन करत आहे. द्रमुक हा विरोधी पक्षाचा प्रमुख सदस्य आणि काँग्रेसचा दीर्घकाळचा मित्र आहे. मुंबईच्या बैठकीत हाच अजेंडा ठरला आहे का? असा सवाल अमित मालवीय यांनी X च्या माध्यमातून विचारला आहे.
दरम्यान, द्रमुकने मात्र म्हटले आहे की, उदयनिधी यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे. त्यांचे सनातन धर्मातील वक्तव्य हे त्या धर्मातील जातीव्यवस्थेला अनुसरुन होते. जेव्हा ते म्हणतात सनातन धर्म संपवायचा तेव्हा त्याचा अर्थ होतो की, त्या धर्मातील जातिव्यवस्था संपृष्टात आणली जावी.