नालासोपारा: बायकोकडून नवऱ्यावर चाकू हल्ला, पोलिसांकडून तपास सुरु
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

नालासोपारा (Nalasopara) येथे एका विवाहित महिलेकडून नवऱ्यावर चाकू हल्ला केल्याची घटना घडली आहे. मात्र महिलेनेच नवऱ्याची हत्या केली असल्याचे उघड झाले असून तिला अटक करण्यात आली आहे. तसेच पोलिसांकडून अधिक तपास सुरु करण्यात आला आहे.

सुनील कदम असे मृत नवऱ्याचे नाव आहे. बायकोचे सुनील सोबत काही कारणावरुन वाद झाला. मात्र हा वाद एवढा विकोपाला गेला की तिला नवऱ्याचा भयंकर राग आला होता. रात्रीच्या वेळेस सुनील झोपला असता तिने पाणी पिण्याच्या बहाण्याने किचनमध्ये जात चाकू घेतला. किचनमधून आणलेला चाकूने तिने झोपलेल्या सुनीलवर मानेवर, हातावर आणि पाठीवर सपासप वार केले. मात्र आपला गुन्हा उघड होऊ नये म्हणून तिने रडण्याचे नाटक सुद्धा केले. तसेच नवऱ्याने स्वत: आत्महत्या केल्याचे घरातील मंडळी आणि पोलिसांना भासवले.(पुणे: दारूच्या नशेत महिलेची पार्क केलेल्या गाड्यांना मुद्दामून टक्कर मारून नासधूस; पोलिस स्थानकात कपडे उतरवण्याची भाषा Watch Video)

तसेच पोलिसांना या प्रकरणी अधिक माहिती दिली असता त्यांची सुद्धा महिलेने दिशाभुल केली. परंतु पोलिसांनी महिलेची कसून चौकशी केली असता तिच्यावर संशय व्यक्त केला गेला.त्यानंतर महिलेला पोलिसांनी अटक केली असून तिची रवानगी पोलिसात केली असल्याचे सांगण्यात येत आहे.