Nagpur Violence (Photo Credit: X/ANI)

मुघल सम्राट औरंगजेब याची कबर ( Mughal emperor Aurangzeb’s Tomb) हटविण्यावरुन निषेधावरून सोमवारी रात्री नागपूरच्या (Nagpur) महाल परिसरात हिंसक संघर्ष (Nagpur Violence) पेटला. या अशांततेमुळे दगडफेक, जाळपोळ आणि पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ले झाले. कायदा व सुव्यवस्था (Law and Order) बिघडली. ज्यामुळे अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले. दंगलीत किमान 10 दंगलविरोधी पोलिस कमांडो, दोन वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि दोन अग्निशमन दलाचे कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. एका पोलिस कॉन्स्टेबल सरकारी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. दंगलखोरांनी मातीकाम करणाऱ्या दोन वाहनांसह इतर 40 वाहने जाळली आणि पोलिस व्हॅनची तोडफोड केली, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

केंद्रीय गृह मंत्रालयाने अहवाल मागितल्यानंतर 50 जणांना अटक

नागपूर पोलिसांनी शहरात शोध मोहीम सुरू केली असून, हिंसाचाराच्या संदर्भात किमान 50 दंगलखोरांना अटक केली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शहर भेटीच्या काही आठवड्यांपूर्वी घडलेल्या या घटनेचा सविस्तर अहवाल केंद्रीय गृह मंत्रालयाने मागितला आहे. (हेही वाचा, Nagpur Violence: औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात हिंसक दंगल; जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनांमुळे वातावरण तापले, CM Devendra Fadnavis यांचे शांततेचे आवाहन (Video))

पुतळा जाळण्याच्या अफवांमुळे हिंसाचार

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार,  उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी महाल गेट येथील शिवाजी पुतळा चौकात औरंगजेबाचे पुतळे आणि धार्मिक 'चादर' जाळल्याच्या अफवांमुळे नागपूर येथे हिंसाचार भडकला. यामुळे दुसऱ्या समुदायाचे सदस्य मोठ्या संख्येने जमले आणि त्यांनी संबंधितांवर तात्काळ पोलिस कारवाईची मागणी केली. अल्पावधीतच परिस्थिती चिघळली, निदर्शकांनी दगडफेक केली, मालमत्तेचे नुकसान केले आणि कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांशी संघर्ष सुरू झाला. चिटणीस पार्क चौकात दंगल नियंत्रण पोलिस तैनात करण्यात आले होते, परंतु हा संघर्ष युद्धक्षेत्रात रूपांतरित झाला, ज्यामुळे आणखी काही जण जखमी झाले.

पोलीस, अग्निशमन दलाचे जवान या संघर्षात जखमी झाले

जखमी झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये डीसीपी (वाहतूक) अर्चित चांडक आणि डीसीपी निकेतन कदम (झोन 5) यांचा समावेश आहे, जे दंगल आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नात जखमी झाले. जळत्या वाहनांना विझवण्याचा प्रयत्न करताना अग्निशमन दलाचे कर्मचारीही तत्कालीन परिस्थिती अडकले. ज्यामुळे त्यांच्या कर्तव्यातही अडथळा आला.

शहरातील विविध ठिकाणी संचारबंदी

देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्याकडून शांततेचे आवाहन

हिंसाचार पसरताच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले. दोन्हीने नेत्यांनी जनते खालील प्रकारे अवाहन केले.

  • मुख्यमंत्री फडणवीस: 'नागपूर हे नेहमीच सौहार्दाचे शहर राहिले आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका आणि कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे मी नागरिकांना आवाहन करतो. पोलिस परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत'.
  • पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर कारवाईचे आश्वासन देत म्हटले की, 'कोणालाही सोडले जाणार नाही'.
  • मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनी आरोप केला की हिंसाचार भडकवण्यासाठी 'बाहेरील लोकांना आणण्यात आले'.
  • नितीन गडकरी: नागरिकांनी शांतता पाळावी, समाजकंटकांवर कारवाई केली जाईल.

सुरक्षा तैनात, प्रतिबंधात्मक आदेश लागू

नागपूरचे पोलिस आयुक्त (सीपी) रविंदर सिंगल यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 1,000 हून अधिक पोलिस कर्मचारी तैनात करण्याचे आदेश दिले. महाल, चिटणीस पार्क चौक आणि भालदारपुरा येथे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत, या संवेदनशील भागात हालचालींवर बंदी घालण्यात आली आहे. पुढील अशांतता टाळण्यासाठी मध्य नागपूरमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे, अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.