
Nagpur Shocker: नागपूर शहरातील गिट्टीखदान या भागात एका झोपडीला आग लागल्याने दोन अल्पवयीन भावंडाचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हजारी पहाड सेमिनरी हिल परिसरात ही दुर्घटना घडली. कडाक्याच्या थंडी पासून बचाव करण्यासाठी शेकोटी लावली होती. शेकोटीमुळे आग झोपडीला लागली आणि या आगीत दोघांचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली. ही दुर्गघटना काल रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली. आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आलं. (हेही वाचा- ठाण्यातील घोडबंदर रोड येथे कंटेनरला भीषण आग, वाहतूक सेवा ठप्प)
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील हजारी पहाट येथे एका झोपडीला शेकोटीमुळे आग लागली. या आगीत दोन भांवडाचा होरपळून मृत्यू झाला. देवांश रणजित उके (वय 7) आणि प्रभास रणजीत उके (वय 2) असे आगीत मरण पावलेल्या मुलांची नावे आहेत. सेमिनरी हिल भागात व्हेटर्नरी कॉलेजमागे गोविंद गोरखेडे कॉम्प्लेक्सच्या समोर असलेल्या झोपडीत ही घटना घडली. थंडी वाढत असल्याने शेकोटी घ्यावी या करिता शेकोटी लावण्यात आली होती. देवांश, प्रभास आणि त्यांच्या बहिणीने शेकोटी झोपडीत लावली. शेकोटीची आग वाढली आणि झोपडीला लागली.
या आगीत देवांश आणि प्रभास यांचा होरपळून मृत्यू झाला. सुदैवाने मोठी मुलगी ओरडत बाहरे आली आणि तीने स्वत:चा जीव वाचवला. मुलांची आई आग लागली होती तेव्हा ती शेजारी होती, आणि त्यांचे वडिल कामाला गेले होते, आगीची माहिती समजताच, आईने आरडाओरड करत शेजारच्या लोकांची मदत घेतली.मात्र, आगीत सर्व जळून खाक झालं होते. या दुदैवी घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.