
नागपूरच्या (Nagpur) उमरेड (Umred) मध्ये 11 वर्षीय मुलीवर महिनाभर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली 9 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान या सामुहिक बलात्कार (Gang Rape) घटनेची बाब एका हत्याकांडाचा (Murder) तपास करताना समोर आली आहे. पोलिस तपासामध्ये मुख्य आरोपी हा बलात्कारी देखील असल्याचं समोर आले असे पोलिसांनी सांगितले आहे.
HT च्या वृत्तानुसार, बलात्कार पीडीता पोलिसांत तक्रार नोंदवण्यासाठी देखील घाबरत होती. मात्र 29 वर्षीय आरोपी रोशन यानेच बलात्काराची देखील कबुली दिली आहे. रोशनने एकाचा गोल्ड रिंग वरून खून केला आहे. त्याच्या तपासामध्येच हा प्रकार उघड झाला आहे. नागपूर ग्रामीण पोलीस उपअधीक्षक DSP Sanjay Purandare यांनी दिलेल्या माहितीनुसार9 जणांना अटक झाली आहे. यामधील आरोपींचे वय 22 वर्ष ते 40 वर्ष आहे.
19 जूनला रोशन त्या मुलीच्या घरी गेला होता. तिला काही आमिष दाखवून आपल्या घरी आणलं आणि मित्र गजाननच्या मदतीने बलात्कार केला. दोघांनी बारीबारीने तिच्यावर बलात्कार केला. तिला याबाबत तोंड बंद ठेवण्यासाठी काही पैसे देखील दिले. पुन्हा काही दिवसांनी तिला घरी बोलावलं आणि अन्य काही मित्रांसोबत तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार महिनाभर सुरू होता. नक्की वाचा: Strap On Penis वापरून ट्रान्सजेंडर व्यक्ती कडून 3 महिलांची Sexual Relationship मध्ये फसवणूक; कोर्टाने सुनावली 10 वर्ष तुरूंगवासाची शिक्षा .
सोन्याच्या अंगठीवरून उमरेड येथील शुभम दामडू (25) या तरुणाचा खून केल्याच्या आरोपाखाली रोशन आणि त्याचा साथीदार बादलला पोलिसांनी अकोला रेल्वे स्थानकावरून अटक केली होती. खून प्रकरणातील तपासामध्ये रोशनने बलात्काराच्या गुन्ह्याची देखील कबुली दिली.