Close
Advertisement
 
शनिवार, नोव्हेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
3 minutes ago

Maharashtra Civic Bypoll Results 2020 Highlights: मुंबई, नाशिक महानगर पालिकेमध्ये महाविकास आघाडीची सरशी; भाजपाची पिछेहाट

महाराष्ट्र Dipali Nevarekar | Jan 10, 2020 01:25 PM IST
A+
A-
10 Jan, 13:24 (IST)

मुंबई, नाशिक महानगर पालिकेमध्ये महाविकास आघाडीची सरशी; भाजपाची पिछेहाट झाली आहे.  इथे पहा संपूर्ण निकाल

10 Jan, 12:47 (IST)

नागपूर महापालिकेमध्ये भाजपा  उमेदवाराने आपला गड  राखला आहे. विक्रम ग्वालबंशी विजयी  झाले आहेत. त्यांनी मआवि च्या उमेदवाराचा पराभव केला आहे.

10 Jan, 12:26 (IST)

मालेगाव पोटनिवडणूकीमध्ये MIM व जनता दलाचे मुस्तकीम डिग्नेटी विजयी झाले आहेत. 

10 Jan, 12:10 (IST)

पनवेल पोटनिवडणूकीच्या निकालामध्ये महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला आहे. भाजपाच्या रूचिता लोंढे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला आहे.  

10 Jan, 11:57 (IST)

 नाशिकमध्ये  मनपा पोटनिवडणूकीमध्ये प्रभाग 22 मधून महाविकास आघाडीच्या जगदीश पवार यांचा 3388 मतांनी विजय झाला आहे. तर सतपूर प्रभाग 26 अ मधून मधुकर जाधव विजयी झाले आहेत. 

 

10 Jan, 11:29 (IST)

नाशिकमध्ये सतपूर प्रभाग 26 अ मध्ये शिवसेनेच्या मधुकर जाधव यांनी मनसेच्या  दिलीप दातीर यांचा पराभव केला आहे.   

10 Jan, 11:17 (IST)

 मुंबई महानगर पालिकेच्या पोटनिवडणूकीत शिवसेनेच्या विठ्ठल लोकरे यांचा विजय झाला आहे. मानाखुर्द येथील प्रभाग क्रमांक 141 मधून विठ्ठल लोकरे यांनी भाजपा उमेदवाराचा 1385 मतांनी पराभव केला आहे. 

10 Jan, 10:34 (IST)

संगीता शेळके यांनी भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे समर्थक कृष्णा म्हाळसकर यांचा पराभव केला आहे.  

10 Jan, 10:02 (IST)

महाराष्ट्रात आज  मुंबई महानगर पलिकेत 1, पनवेल महानगर पालिकेत 1, नाशिक महानगर पालिकेत 2, मालेगावमध्ये एका जागेसाठी  तर नागपूर महापलिकेत 1 जागेसाठी पोटनिवडणूक काल (9 जानेवारी) पार पडली आहे. 

10 Jan, 08:59 (IST)

नागपूर, नाशिक, मालेगाव, मुंबई महानगर पालिका पोटनिवडणूक निकाल मतमोजणीला सुरूवात झाली आहे. दरम्यान मतमोजणी केंद्राजवळ चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. 

Municipal Corporations Bypoll Results 2020: महाराष्ट्रात जिल्हा परिषद निवडणूकींचा धुरळा उडाल्यानंतर आज नाशिक, नागपूर, मालेगाव,मुंबई महानगरपालिकांमधील पोटनिवडणुकींच्या निकालाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान काल या पोटनिवडणूकींसाठी मतदान पार पडले आहे. काही वेळापूर्वीच या निवडणूक निकालांच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे.

नागपूरमध्ये एका जागेसाठी तर नाशिकमध्ये 2 जागांसाठी तसेच मालेगावमध्ये एका जागेसाठी आणि मुंबई महानगर पालिकेत एका जागेसाठी काल झालेल्या पोटनिवदणूकीच्या मतदानानंतर आज निकालाची प्रतिक्षा आहे. नाशिकमध्ये प्रभाग क्रमांक 22 आणि प्रभाग क्रमांक 26 मधील प्रत्येकी एका रिक्त जागेसाठी निवडणूक झाली आहे. तर मालेगावमध्ये JDS नेते बुलंद इक्बाल (Buland Iqbal) यांच्या निधनानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक झाली. नागपूरमध्ये 12-D या प्रभागासाठी पोटनिवडणूक झाली आहे. तर मुंबई महापालिकेच्या मानखुर्द प्रभाग क्रमांक 141 मध्ये आज पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे विठ्ठल लोकरे, भाजपचे बबलू पांचाळ, काँग्रेसचे अल्ताफ काझी, एमआयएमचे खान सद्दाम हुसेन इमामुद्दिन आणि समाजवादी पक्षाचे जमीर खान या उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे.

महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणूक निकालांसाठी सुरू असलेल्या मतमोजणी केंद्रांवर आज सकाळपासून चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दरम्यान थोड्याच वेळात हे निकाल स्पष्ट होतील.


Show Full Article Share Now