Tukaram Mundhe | (Photo Credit: Facebook)

Tukaram Mundhe Corona Positive: नागपूर महापालिका आयुक्त (Nagpur Municipal Commissioner) तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांना कोरोना विषाणूची (Coronavirus) लागण झाली आहे. यासंदर्भात त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, माझी कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर माझा कोरोना रिपार्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी स्वत: ला क्वारंटाईन केलं आहे.

गेल्या 14 दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकांनी आपली कोरोना चाचणी करावी, अशी विनंतीदेखील तुकाराम मुंढे यांनी केली आहे. नागपुरातील कोरोना नियंत्रणात येण्यासाठी मी घरातून काम करेन, असेही तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे. या ट्विटमध्ये तुकाराम मुंढे यांनी आपण नक्की जिंकू, असा विश्वाव व्यक्त केला आहे. (हेही वाचा - Raigad Building Collapse Update: महाड इमारत दुर्घटनेमध्ये 2 जणांचा मृत्यू, 18 जण अडकल्याची भीती; बचावकार्य अजूनही सुरू)

दरम्यान, राज्यात कोरोनाग्रस्तांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढत आहे. आतापर्यंत अनेक कोरोना योद्ध्यांना तसेच राजकीय नेते, कलाकार आणि अधिकाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. मात्र, यातील अनेकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत असेल, तरी कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील वाढत आहे.