नागपूर मध्ये पावसाविना बळीराजाचे हाल, येत्या पाच दिवसात पावसाची चिन्हे नाहीच; हवामान खात्याचा अंदाज
No Rain In Nagpur (Photo courtesy: Archived, Edited Images)

Nagpur Monsoon Updates: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातल्याचा घटना मागील दिवसात सातत्याने समोर येत होत्या. मुंबईत तर धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे बरीचशी धरणे सुद्धा भरल्याचे समजत आहे, मात्र नागपूर (Nagpur) मध्ये याहून अगदी उलट परिस्थिती पाहायला मिळतेय. पावसा अभावी विदर्भातील बळीराजा पुरता हैराण झाला आहे. इतकंच नव्हे तर नागपूर वासियांची पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा पंचाईत झाली आहे. यात भर म्ह्णून पुढील पाच दिवसात देखील पाऊस पडणार नसल्याचा अंदाज हवामान खात्याचे (IMD) विभागीय प्रमुख एम. साहू (M.Sahu) यांनी वर्तवला आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, नागपूर मध्ये सध्या पावसासाठी पूर्णपणे प्रतिकूल परिस्थिती आहे, त्यामुळे येत्या पाच दिवसात तरी पावसाची काहीच चिन्हे नाहीत, त्यानंतरही पाऊस आलाच तर तो मोजक्या एक दोन ठिकाणीच येईल अशी शक्यता आहे. याशिवाय यंदा सरासरीच्या तुलनेत तब्बल 28% कमी पर्जन्याचा इशारा देखील वर्तवला जात आहे.

ANI ट्विट

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 11 जुलै ला नाशिक परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता, ज्यामुळे गोदावरी नदीला पूर येऊन त्र्यंबकेश्वर येथील महादेवाच्या मंदिरात पाणीच पाणी झाले होतेअक्षरशः गुडघाभर पाण्यात हे मंदिर पाहायला मिळाले होते, पण याच वेळी नागपूर सह विदर्भातील अन्य भागातील ही परस्परविरोधी परिस्थिती आश्चर्यकारक आहे.