नागपूर: मॉलमधील कपड्याच्या ट्रायलरुम मध्ये छुप्यारितीने मुलींचे व्हिडिओशूट, तरुणीच्या चालाखीने झाला भांडाफोड
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

नागपूर (Nagpur) येथे एका रेडीमेट कपड्यांच्या मॉलमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मॉलमधील एका कपड्याच्या दुकानाच्या ट्रायलरुम मध्ये छुप्यारितीने मुलींचे मोबाईलमधून व्हिडिओशूट केले जात होते. मात्र तरुणीच्या चालाखीने या प्रकाराचा भांडाफोड झाला आहे.

एका कॉलेज तरुणीला कपडे आवडले म्हणून तिने ट्रायलरुममध्ये जाऊन घालून पाहिले. मात्र तरुणीला ट्रायरुममध्ये एका ठिकाणी हिडन कॅमेरा असल्याचा संशय येताच तिने त्याचा शोध घेतला. त्यावेळी ट्रायलरुमच्या एका कोपऱ्यात मोबाईलचा कॅमेरा सुरु असलेले दृश्य दिसून आले.

या तरुणीने तो मोबाईल घेत त्यामधील व्हिडिओ पाहिले. तेव्हा तिचा कपडे ट्राय करत असल्याचा व्हिडिओ त्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झालेला दिसून आला. या प्रकारानंतर तरुणीने तो मोबाईल घेऊन तातडीने पोलीस स्थानकात पोहचली. पोलिसांनी घटनास्थळी पोहतच घडलेल्या प्रकाराचा अधिक तपास केला.(मुंबई: चर्चगेट- माटुंगा दरम्यान धावत्या लोकल मध्ये महिलेला डोळा मारणारा प्रवासी पोलिसांच्या ताब्यात, वाचा नेमकं घडलं काय?)

पोलिसांच्या तपासणीत असे समोर आले की, शोरुमच्या मालकासह त्याच्या कर्मचाऱ्याने मिळून हा प्रकार घडवून आणला होता. या दोघांच्या विरोधात कारवाई करण्यात आली असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.