(संग्रहित प्रतिमा)

लग्नाची मागणी केली म्हणून प्रियकराने गळा आवळून आपल्या प्रेयसीचा खून (Murdered) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना नागपूर (Nagpur) येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कॉम्प्लेक्स परिसरात मंगळवारी घडली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत तरूणीचे गेल्या काही दिवसांपूर्वी ओळख झाली होती. त्यानंतर या ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले. दरम्यान, संबंधित तरुणी सतत आरोपीकडे लग्नाची मागणी करायची. मात्र, मृत तरुणीने पुन्हा मंगळवारी लग्नाची मागणी केली असताना संतापलेल्या आरोपीने ओळणीने गळा आवळून तिचा खून केल्याची समजत आहे. या घटनेमुळे आजूबाजुच्या परिसरात धक्कादायक वातावरण निर्माण झाले.

हुस्ना जबीन शेख (22) रा. महेंद्रनगर, टेका असे मृत तरुणीचे नाव आहे. तर, आसिफ शेख असे आरोपीचे नाव आहे. हुस्ना ही सीताबर्डी झांशी राणी चौकातील फायडॉक्स टेक्नॉलाजी या दुकानात काम करीत होती. याच दुकानात तिची आसिफशी ओळख झाली. त्यानंतर मैत्री आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यांच्या प्रेमाची माहिती हुस्नाच्या कुटुंबीयांना मिळाली. दोघांच्याही कुटुंबाचा त्यांच्या विवाहाला विरोध होता. पण, हुस्ना त्याला विवाहकरिता गळ घालत होती. आसिफ याची विवाहाची इच्छा नव्हती. तो तिला टाळत होता. त्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू होता. गेल्या काही दिवसांपासून ती तणावात होती. त्यामुळे रविवारी तिने आसिफला भेटण्यासाठी मंगळवारी कॉप्लेक्सजवळ बोलवले. त्या ठिकाणी ते भेटले. तेथून ते शारदा चौकात गेले. नाश्ता केल्यानंतर पुन्हा ते कॉम्प्लेक्समध्ये परतले. यावेळीही तिने त्याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला. रात्र बरीच झाली होती. दरम्यान, दोघांमध्ये प्रचंड वाद झाला. त्यानंतर आसिफने तिच्याच ओढणीने हुस्नाचा गळा आवळून तिचा खून केला. पहाटे या परिसरातील चहाच्या दुकानात नाश्ता करण्यासाठी आलेल्या लोकांना हुस्ना बेशुद्ध अवस्थेत आढळली. त्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिसांना या संदर्भात माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेऊन हुस्नाचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवला. त्यावेळी हुस्नाचा गळा आवळल्याने खून झाल्याचे स्पष्ट झाले. हे देखील वाचा- नागपूर: कोरोनामुळे नव्हे तर संसर्गाच्या भीतीने गेला जीव; विष प्यायलेल्या तरुणाला हॉस्पिटल मध्ये न्यायला उशीर केल्याने मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुस्नाच्या मृतदेहाजवळ त्यांना एक बॅग भेटली. हुस्नाचे त्या बॅगेत बरेच साहित्य त्यांना भेटले. त्यात तिचे आधारकार्ड होते. यावरून तिची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी तिच्याबाबतीत संपूर्ण माहिती गोळा केली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आसिफला अटक केली. आशिफ हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हेही दाखल आहेत. त्याला काही महिन्यांपूर्वी तडिपार करण्यात आले होते.