नागपूरात लग्नसमारंभातील मंडळींसाठी मर्यादा, नियमांचे उल्लंघन केल्यास 25 हजारांचा दंड वसूल केला जाणार
Image For Representation (Photo Credits: Pixabay)

देशभरासह राज्यात कोरोनासह त्याचा नवा वेरियंट ओमिक्रॉन याच्या रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच कठोर निर्बंध लावण्यास आता स्थानिक प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर नागपुरात ही कोरोनाच्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने कठोर निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहेत. (Omicron Cases In Maharashtra: महाराष्ट्र आरोग्य विभागानं थांबवलं कोविड सॅम्पल्सचं Genome Sequencing; 'हे' आहे कारण)

नव्या आदेशानुसार लग्न समारंभासाठी आणि अन्य सामाजिक कार्यक्रमांसाठी  50 माणसांची मर्यादा ठेवण्यात आली आहे. परंतु जर ही मर्यादा ओलांडल्यास किंवा नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करत 25 हजार रुपयांचा दंड वसूल केला जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

पहिल्या वेळेस कारवाई केल्यानंतर पुन्हा तिच चूक केल्यास कार्यक्रमाचे आयोजक, सभागृह किंवा जागा मालकावर गुन्हा दाखल केला जाईल. त्याचसोबत ते ठिकाण सील ही केली जाईल असे नागपूर महापालिकेने नव्या आदेशात म्हटले आहे.(Omicron Scare in Maharashtra: महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर लागू शकतो का पुन्हा लॉकडाऊन? यावर Maharashtra Health Department ने दिली महत्त्वाची माहिती)

कार्यक्रम ज्या ठिकाणी आयोजित केले जातील त्याची 15 दिवस आधी माहिती महापालिकेला द्यावी. त्याचसोबत कार्यक्रम किंवा एखाद्या सामाजिक कार्यादरम्यान महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी किंवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक अचानक भेट देऊ शकतात. त्यामुळे तेव्हा तेथे नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास कारवाई केली जाईल. समारंभाच्या ठिकाणी मास्क घालणे, कोरोनाच्या नियमांचे पालन करणे आणि सोशल डिस्टंन्सिंग पाळणे आवश्यक असणार आहे. तसेच लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच परवानगी असणार आहे.