Nagpur: बायको दारूला पैसे देत नसल्याच्या रागातून बापाने एक वर्षांच्या बाळाला दगडावर फेकले; मुलाचा मृत्यू
Baby (Photo Credits; Pixabay) (Representational image Only)

आतापर्यंत मुलगी जन्माला आली म्हणून त्या बाळाचा किंवा बाळाच्या आईचा छळ झाल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील. मात्र नागपुरात (Nagpur) एका वडिलांनी मुलगा झाला म्हणून आपल्या एक वर्षाच्या मुलाची अतिशय निर्दयपणे हत्या केली आहे. दारू पिल्यानंतर रागात या मद्यधुंद वडिलांनी आपल्या मुलाला घराच्या अंगणात असलेल्या दगडावर फेकले, यामुळे बाळाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अगदी काही क्षणातच आईच्या डोळ्यासमोर या मुलाचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तहसीलमधील खापा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

एका पित्याने आपल्या एका वर्षाच्या मुलाची हत्या केल्याच्या घटनेने परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. सत्यम भजन कौरती असे या निष्पाप मुलाचे नाव होते तर भजन कौरती बापाचे नाव आहे. सध्या पोलिसांनी या बापाला अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दारूच्या नशेत घरात आला व त्याने पुन्हा दारू पिण्यासाठी पत्नीकडे पैसे मागण्यास सुरवात केली. पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्याने तो तिच्यासोबत भांडू लागला. (हेही वाचा: तरुणाला थोबाडीत मारणाऱ्या जिल्हाधिकाऱ्याच्या विरोधात कारवाई, मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या निर्देशनावरुन पदावरुन हटवले)

हे भांडण वाढल्यानंतर दारूला पैसे मिळत नसल्याचा राग बापाने मुलावर काढला. आपल्याला मुलगी हवी होती मात्र तू एका मुलाला जन्म दिलास, असे मद्यपी आरोपी बापाने आपल्या बायकोला सांगितले. त्यानंतर त्याने आपल्या निरागस एक वर्षांच्या मुलाला अंगणातील दगडावर फेकले, ज्यामुळे निष्पाप जागीच ठार झाला. ही घटना इतक्या वेगाने घडली की, आपल्या बाळाला वाचविण्याची संधी आईला मिळालीच नाही. पत्नीच्या तक्रारीनंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.