महाराष्ट्रात राजकीय समिकरणं बदलल्यानंतर राजकीय पक्षांनी आपापला विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. प्रामुख्याने शिवसेना (Shiv Sena), भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP). शिवसेनेने विदर्भात पक्षवाढ करत भाजपला मोठा झटका दिला आहे. हिंगणघाट नगरपरिषदेतील (Nagar Parishad Hinganghat) विद्यमान 10 व दोन माजी नगरसेवकांन आज (21 जून) शिवसेना पक्षात प्रवेश केला. या सर्व नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले. या पक्षप्रवेशावेळी शिवसेना सचीव, खासदार अनिल देसाई, वर्धा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख, अनंत गुढे हे उपस्थित होते.
शिवसेनेत प्रवेश केलेले नगरसेवक
- चंद्रकांत घुसे (हिंगणघाट नगरपरिषदचे उपाध्यक्ष)
- सतीश धोबे (नगरसेवक)
- सुरेश मुंजेवार (नगरसेवक)
- मनीष देवढे (नगरसेवक)
- मनोज वर्धने (नगरसेवक)
- भास्कर ठवरे (नगरसेवक)
- निलेश पोगले (नगरसेवक)
- नीता धोबे (महिला- नगरसेवक)
- संगीता वाघमारे (महिला- नगरसेवक)
- सुनीता पचोरी (महिला- नगरसेवक)
- देवेंद्र पढोले (माजी नगरसेवक)
- प्रतिभा पढोले (माजी नगरसेवक)
शिवसेना ट्विट
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट नगर परिषदेतील १३ नगरसेवक आणि नगरसेविकांनी आज शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. pic.twitter.com/tDLMJ5TH48
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) June 21, 2021
शिवसेना पक्षात प्रवेश केलेले वरील सर्व नगरसेवक हे पाठीमागील सहा महिन्यांपासून शिवसेना वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख अनंत गुढे यांच्या संपर्कात होते. परंतू, रोज्यातील कोरोना स्थिती आणि लॉकडाऊन आदी कारणांमुळे हा पक्षप्रवेश पुढे ढकलला जात होता. अखेर कोविडमुळे असलेली संचारबंदी उठताच हिंगणघाट नगरपरिषदचे उपाध्यक्षांसह आजी-माजी 10 नगरसेवकांनी शिवबंधन बांधत शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला. या वेळी शिवसेना पक्षप्रमुख आणि नेत्यांसह शिवसेना विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ, जिल्हाप्रमुख अनिल देवतारे, प्रशांत शहागडकर तसेच हिंगणघाट येथील युवासेनेचे जिल्हाधिकारी अभिनंदन मुनोत यांच्यासह शिवसैनिकही उपस्थित होते.