My PHC - ZP Pune App  देणार पुणेकरांना सरकारी Doctors Appointment ते Medical Reportsअवघ्या एका क्लिकवर
Pune ZP Photo Credit : commons.wikimedia and google play store

My PHC - ZP Pune App : सरकारी काम आणि अनंत काळ थांब हा प्रत्यय अनेक लहान मोठ्या कामांमध्ये आला असेल. प्रामुख्याने सरकारी हॉस्पिटल्स आणि दवाखान्यांमध्ये रूग्णांची गर्दी, तज्ञ डॉक्टरांची वेळीच भेट होणं, वैद्यकीय चाचण्या (Medical Test)  आणि त्यानंतर मिळणारे रिपोर्ट्स (Medical Reports)  यासाठी रूग्णांना आणि सोबतच त्यांच्या नातेवाईकांना हेलपाटे मारावे लागतात. पण आता पुण्याच्या जिल्हा परिषदेच्या (Pune Zilha Parishad) आरोग्य विभागाने यावर तोडगा काढला आहे. आरोग्य विभागाकडून पुणेकरांना गैरसोय टाळण्यासाठी My PHC - ZP Pune App उपलब्ध करून देण्यात आले आहे.

My PHC - ZP Pune App या अ‍ॅपवर सरकारी सुट्ट्यांप्र्माणे कोणते विभाग आणि डॉक्टर याची माहिती नागरिकांना मिळणार आहे. सरकारच्या आरोग्यविभागाच्या योजना, सवलती सोबतच वैद्यकीय चाचण्या आणि त्यांचे रिपोर्ट्स एका क्लिकवर मोबाईलवर पुणेकरांना पाहता येणार आहेत. विशिष्ट तज्ञ डॉक्टराची अपॉईंटमेंटदेखील या अ‍ॅपच्या मदतीने घेणं शक्य होणार आहे.

गूगल प्ले स्टोअर (Google Play Store)  वर My PHC - ZP Pune App मोफत उपलब्ध आहे. हे App  मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर नोंदणी करताना गावाचं नाव, आरोग्य केंद्राची निवड अवघ्या एका क्लिकवर उपलब्ध आहे. याद्वारा तुम्हांला डॉक्टरांची भेट घेणं शक्य होणार आहे.

सरकारी डॉक्टर आणि रूग्णांमध्ये पारदर्शक व्यवहार

पुणे आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर नागरिकांच्या अपॉईंटमेंट वेळा निश्चित करू शकणार आहे. वेळ ठरवण्याची आणि रद्द करण्याची सोय डॉक्टरांकडे देण्यात आली आहे. मात्र अपॉंईटमेंट रद्द करताना डॉक्टरांना कारण देणं आवश्यक आहे. डॉक्टरांची अपॉंईटमेंट मिळाल्यास रूग्णाला त्याचं नोटिफिकेशन मिळणार आहे. अपॉंईंटमेंट रद्द झाल्यानंतरही नागरिका मेसेज पाठवला जाणार आहे.