मालेगाव येथील मुस्लिम बांधवांनी घरातच राहून केली रमजान ईद साजरी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले आभार

रमजान ईदच्या (Ramadan Eid) निमित्ताने आज देशभरात वेगळाच उत्साह आणि चैतन्यपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. लॉकडाऊन असल्यामुळे अनेक मुस्लिम बांधव घरात नमाज अदा करून हा सण साजरा केला आहे. यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मालेगाव (Malegaon) येथील मुस्लीम बांधवांचे मनापासून आभार मानले आहे. कोरोना विषाणूने संपूर्ण महाराष्ट्र धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशातील अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. दरम्यान, सोशल डिस्टिंगचे नियमाचे पालन करणे अधिक महत्वाचे आहे. यातच घरातच राहून रमजान ईद साजरी करा असे, आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी मालेगाव येथील मुस्लिम बांधवांचे आभार मानले आहेत.

सध्या संपूर्ण देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. यामुळे सोशल डिस्टन्सचे पालन करणे अधिक गरजेचे आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी रविवारी मुस्लिम बांधवांना रमजान ईदची नमाज घरीच अदा करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला मालेगावकरांनी प्रतिसाद दिला आहे. मालेगावातील एका मैदानात गेल्या वर्षी मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मात्र, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मालेगाव येथील मुस्लिम बांधवांनी घरातच राहून नमाज अदा केली आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांनी मालेगावकरांचे आभार मानले आहे. हे देखील वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समस्त मुस्लिम बांधवांना ईल उल फित्र च्या शुभेच्छा देत केले महत्त्वाचे आवाहन

ट्वीट-

रमजान हा मुस्लीम बांधवांसाठी पवित्र महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात रोजे अर्थात उपवास करण्यासोबतच अनेक गोष्टींची बंधन स्वत:वर घालून घ्यायची असतात. त्यामुळे रमजानचा महिना मुस्लीम बांधवांसाठी खास असतो. त्यातच रमजान ईदच्या दिवशी मुस्लीम बांधव एकमेकांची गळाभेट घेत रमजान ईदच्या शुभेच्छा देतात. मात्र, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यावर्षी मुस्लिम बांधवाना रमजान ईदचा सण घरातच राहून साजरा करावा लागत आहेत. यामुळे मुस्लिम समाजीतील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे