मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समस्त मुस्लिम बांधवांना ईल उल फित्र च्या शुभेच्छा देत केले महत्त्वाचे आवाहन
Chief Minister Uddhav Thackeray | (Photo Credits- Facebook )

रमजान ईदच्या (Ramzan Eid) निमित्ताने आज देशभरात वेगळाच उत्साह आणि चैतन्यपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. लॉकडाऊन असल्यामुळे अनेक मुस्लिम बांधव घरात नमाज अदा करून हा सण साजरा करत आहे. अशा पवित्र सणानिमित्त समस्त मुस्लिम बांधवांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ईद उल फित्र (Eid ul Fitr) निमित्त मुस्लिमांना शुभेच्छा देऊन महत्त्वाचे आवाहनही केले आहे. या सणाला कुठलेही गालबोट लागू नये म्हणून देशभरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुस्लिमांना ईदच्या शुभेच्छा देत त्याग व समर्पणाची शिकवण देणाऱ्या या सणानिमित्त शुभेच्छा देतानाच हा सण घरातच साजरा करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

हेदेखील वाचा- Eid-ul-Fitr 2020 दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना दिल्या रमजान ईद मुबारकच्या शुभेच्छा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भारतीयांना ईद मुबारक (Eid Mubarak) म्हणत शुभेच्छा दिल्या आहे. दरम्यान या काळात समाजातील सौख्य, एकात्मता, बंधुता अबाधित राहो. प्रत्येकाला निरोगी आणि भरभराटीचं आयुष्य मिळू दे अशी त्यांनी प्रार्थना केली आहे.