Eid-ul-Fitr 2020 दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना दिल्या रमजान ईद मुबारकच्या शुभेच्छा
आज भारतामध्ये Eid-ul-Fitr चं पर्व साजरं केलं जात आहे. यानिमित्ताने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भारतीयांना ईद मुबारक (Eid Mubarak) म्हणत शुभेच्छा दिल्या आहे.
आज भारतामध्ये Eid-ul-Fitr चं पर्व साजरं केलं जात आहे. यानिमित्ताने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भारतीयांना ईद मुबारक (Eid Mubarak) म्हणत शुभेच्छा दिल्या आहे. दरम्यान या काळात समाजातील सौख्य, एकात्मता, बंधुता अबाधित राहो. प्रत्येकाला निरोगी आणि भरभराटीचं आयुष्य मिळू दे अशी त्यांनी प्रार्थना केली आहे. दरम्यान Eid-ul-Fitr या सणाने रमजान महिन्याची सांगता होते. महिनाभर मुस्लिम बांधव रमजान महिन्याच्या 30 दिवसामध्ये कडक उपवास पाळतात. इस्लामिक धर्माच्या मान्यतेनुसार, रमजान महिन्यात अल्लाह जन्नतचे दरवाजे उघडतो. प्रामाणिकपणे मागितलेली प्रत्येक दुआ तो पूर्ण करतो. त्यामुळे रमजान महिना हा अत्यंत पवित्र महिन्यापैकी एक आहे. Eid Mubarak 2020 Wishes: रमजान ईद च्या शुभेच्छा मराठी Messages, GIF Images, WhatsApp Stickers, Facebook Greetings च्या माध्यमातून शेअर करून 'ईद उल फितर' चा सण करा स्पेशल!
नरेंद्र मोदी यांचे ट्वीट
Eid Mubarak!
Greetings on Eid-ul-Fitr. May this special occasion further the spirit of compassion, brotherhood and harmony. May everyone be healthy and prosperous.
— Narendra Modi (@narendramodi) May 25, 2020
चंद्रदर्शनानुसार, ईदची तारीख ठरते. दरम्यान यंदा शव्वाल चंद्र पाहण्यासाठी शनिवारी भारतामध्ये प्रयत्न झाले. मात्र चंद्र न दिसल्याने अनेक ठिकाणी 30 दिवसांचे रोजे पूर्ण करून आज (25 मे) दिवशी ईद साजरी केली जाणार आहे. तर केरळ, कर्नाटक आणि जम्मू कश्मिर मध्ये काल 24 मे दिवशी रमजान ईद साजरी केली गेली. भारतामध्ये यंदा रमजान महिना आणि आता ईदवरही कोरोनाचं संकट असल्याने घरच्या घरी ईद साजरी करण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 25, 2020 08:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

