Road Accident | (Photo credit: archived, edited, representative image)|

पाण्याच्या टँकरने दुचाकीला मागून दिल्याने झालेल्या अपघातात एकाच मृत्यू झाला Accidentaccaआहे. विनोद कृष्णा सुतार ( वय 46) अशी मृत व्यक्तीची ओळख पटली आहे. सुतार हे पिंपरी चिंचवड येथील प्रसिद्ध तबला वादक आणि संगीत शिक्षक होते. हा अपघात कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर असणाऱ्या कातोली फाट्याजवळील लक्ष्मी पॅलेस हॉलसमोर रविवारी ( दि. 11) दुपारी घडला. या अपघात प्रकरणात कोल्हापूर येथील करवीर पोलिसांनी टँकरचालक मुश्ताक अन्सारी (रा. केर्ली) यास अटक केली असून, सदोष मनुष्य वदाचा गुन्हा दाखल केला आहे.

करवीर पोलिसांनी माहिती देताना सांगीतले की, सुतार हे संगीत शिक्षक असून, ते पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संगीत अकादमीत अध्यापनाचे काम करत. ते मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील गोगवे गावचे रहिवासी आहेत. मात्र, नोकरीनिमित्त ते पिंपरी चिंचवड येथे राहत असत. मी महिना असल्याने शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागल्याने ते सर्वदी असलेल्या पिशवी गावी आले होते. येथूनच ते आपल्या कोल्हापूरला असलेल्या भाच्याला भेटण्यास निघाले होते. दरम्यान, दुचाकीवरिमुते निघाले असता, पाठीमागून आलेल्या आणि पाण्याने भरलेल्या टँकरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

टँकरने दिलेली धडक इतकी तीव्र होती की, ते दुचाकीवर उडाले आणि पुढे काही अंतरावर पडले. त्यातच पाठीमानून आलेल्या टँकरचे चाक त्यांच्या अंगावरून गेले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच गाव कामगार पोलीस पाटील यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली. तसेच, सुतार यांना 108 क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषीत केले.