
Pune Crime: पुण्यात कौटुंबिक वादातून पतीने आपल्या पत्नीचा आणि मुलीचा झोपेत त्यांच्यावर चाकून वार करून तसेच हाताची नस कापून आणि उशीन तोंड दाबून हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली. पतीने दोघांची निर्घृण हत्या केली. ही घटना पुण्यातील भारती विद्यापीठ जवळील दत्तनगर येथे घडली आहे. आज सकाळी या घटना उघडकीस आली. पोलिस या प्रकरणी पुढील कारवाई करत आहे. (हेही वाचा- सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या वाहनावर हल्ला, एक जण जखमी, नागपूरमधील धक्कादायक घटना)
मिळालेल्या माहितीनुसार,अजय तळेवाले असं आरोपीचे नाव आहे. श्वेता तळेवाले आणि शिरोली तळेवाले असे खून झालेल्या आई आणि मुलीची नावे आहेत. आरोपीने आर्थिक वादातून आणि कौटुंबिक वादातून दोघींची हत्या केली आहे. खून केल्यानंतर आरोपी स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाला. त्यानंतर भरती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी अजयने पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला. आरोपीने पोलिस ठाण्यात सांगितले की, माझ्या आणि माझ्या पत्नी यांच्यात पैश्यावरून भाडंण होत असे. गेल्या काही दिवसांपासून या गोष्टी सतत होऊ लागल्या होत्या. भांडणाला कंटाळून शुक्रवारी रात्री झोपेत हत्या केली. शुक्रवारी सकाळ पासून तणावात असताना श्वेता भांडण करत होती. यांच गोष्टीचा राग मनात धरून झोपेत असताना श्वेताची नस कापली. तिच्यावर चाकून वार केला आणि तिचे आणि मुलीचे तोंड दाबून हत्या केली.मुलगी शिरोली श्वेताची बाजू घेत असल्यामुळे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.