Nagpur Crime: पुणे शहरा प्रमाणे नागपूर शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहेत. दरम्यान पोलिस ठाण्यासमोरच हल्लेखोरांनी दहशत पसरवली आहे. नागपूरमध्ये सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या वाहनचालकावर कुऱ्हाडीने हल्ला केला आहे. या घटनेत एक जखमी झाला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील कपील नगर पोलिस ठाण्यात ही घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रफुल जगदेवराव धर्माळे हे पोलिस कर्मचारी सहाय्यक आयुक्तांचे वाहनचालक आहेत. आज १६ मार्च सकाळी त्यांनी पोलिस आयुक्तांना स्टेशनच्या आवारात सोडले आणि त्यानंतर आरोपीने अचानक लोखंडी कुऱ्हाडीने प्रफुल धर्माळे यांच्यावर वार केले. या घटनेनंतर पोलिस ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- एपीएमसी मार्केटच्या गोडाऊनमध्ये साफ सफाई करताना महिलेच्या अंगावर कोसळली गोण्यांची छप्पी)
पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांनी आरडाओरड केल्यानंतर इतर सहकारी पोलिस कर्मचारी त्यांच्या मदतीला आले. या हल्ल्यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे नागरिकांनी प्रशासना समोर सुरक्षतेचा प्रश्न उभा केला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. दिलीप चुनकरे असं हल्ला करणाऱ्या आरोपीचे नावा आहे. आरोपीची मानसिक स्थिती बरोबर नसल्याचे बोलले जात आहेत. या धक्कादायक घटनेमुळे पोलिस ठाणे परिसरात खळबळ माजली आहे.