Representational Image (Photo Credits: Facebook)

रबाळेमध्ये (Rabale) एका महिलेचा तिच्या नातेवाईकांनी (Relative) गळा आवळून खून (Murder) केल्याचे समोर आले आहे. 36 वर्षीय महिलेचा शवविच्छेदनात मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांना (Rabale Police) आला. त्यात गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाले असून रबाळे पोलिसांनी मृताच्या नातेवाईकाला अटक केली आहे. समाधान श्रीमंत लेंडवे असे आरोपीचे नाव आहे. तो बँक कर्मचारी आणि मृताचा नातेवाईक असून त्याला गुरुवारी रात्री अटक करण्यात आली. 21 ऑक्टोबर रोजी मयत शितल मनोहर निकम हि घरात मृतावस्थेत आढळून आले होती ज्यामध्ये तिने स्वतःच्या इच्छेने आत्महत्या (Suicide) करत असल्याचे लिहिले होते.

कुटुंब कर्जाखाली होते आणि आर्थिक ताणामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा प्राथमिक अंदाज होता. परंतु शवविच्छेदन अहवालात गळा दाबून मृत्यू झाल्याची पुष्टी झाल्यावर आम्ही आमचा तपास सुरू केला. त्यानंतर लांडवेने तिचा खून केल्याचा संशय व्यक्त केला, असे रबाळे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भागुजी औटी यांनी सांगितले. हेही वाचा Mumbai Crime: मीरा रोडमध्ये बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंजचा पर्दाफाश, एकास अटक, दहशतवादविरोधी पथकाची कारवाई

मृताच्या पतीने आरोपींकडून 6.5 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. आरोपीने त्याच्या नावावर बँकेतून वैयक्तिक कर्ज घेतले होते. मृतक आणि तिचा पती मासिक ईएमआयचे पैसे देत नसल्यामुळे लांडवे यांच्यावर कामाच्या ठिकाणी दबाव होता.  तपासा दरम्यान पोलिसांना आढळून आले की आरोपीचे मृताशी कथितरित्या अवैध संबंध होते. तसेच जेव्हा तिची मुले वर्गात आणि पती कामावर जातात तेव्हा तो दररोज तिच्याकडे जात असे.

घटनेच्या दिवशी इमारतीतील इतरांनी त्याला सोसायटीत येताना पाहिले होते. मृताने त्याचा चुलत भाऊ असा उल्लेख केला. घटनेच्या दिवशी आरोपीने पैशाची मागणी केली आणि तिच्याशी भांडण केले. त्यानंतर आरोपीने सुसाईड नोट लिहून तिचा गळा आवळून खून केला. त्याने तिला लटकवण्याचा प्रयत्न केला पण तसे करता आले नाही.  त्यामुळे तिला जमिनीवर पडून ठेवले.

घराचं दार थोडं उघडं होतं. त्यांचा दोन वर्षांचा मुलगा घरात शिरला आणि त्याच्या पाठीमागे त्याची आजी आली. मृताला जमिनीवर पडलेले पाहिले आणि नंतर तिच्या कुटुंबाला सावध केले, असे औटी म्हणाले. आरोपीला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्याला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.