Nupur Sharma | (PC - Twitter)

भारतीय जनता पक्षाच्या (BJP ) निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांना मुंब्रा पोलिसांनी (Mumbra Police) समन्स बजावले आहे. मुंब्रा पोलिसांनी दिलेल्या समन्सनुसार नुपूर शर्मा (Mumbra Police Summons Nupur Sharma) यांना 22 जूनरपर्यंत चौकशीसाठी हजर व्हायचे आहे. शर्मा यांच्या विरोधात तीन गुन्हे दाखल आहेत. शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान, पैंगंबर मोहम्मद यांच्यावर काही टिप्पणी केली होती. त्यामुळे त्या जोरदार वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. हा वाद वाढल्याचे पाहताच भाजपने त्यांना निलंबीत केले आहे.

ठाण्यातील मुंब्रा पोलिसांनी नुपूर शर्मा यांना 22 जून पर्यंत पोलिसांत चौकशीसाठी हजर होण्यास सांगितले आहे. दुसऱ्या बाजूला मजलिस-ए-इत्तेहादुल पक्षाचे प्रमुख असदूद्दीन ओवैसी यांच्यासह अनेकांनी नुपूर शर्मा यांना अटक करावी अशी मागणी केली आहे.याशिवाय ईरान, इराक यांसह जवळपास 14 देशांतून भाजपच्या अनेक नेत्यांनी केलेल्या टिप्पणीबाबत नाराजी नोंदवली आहे. दरम्यान, शर्मा यांनी आपले विधान मागे घेण्याची घोषणा केली होती. (हेही वाचा, Nupur Sharma: भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल)

नुपूर शर्मा यांना वादग्रस्त वक्तव्यानंतर दिल्ली पोलिसांनी सुरक्षा प्रदान केली आहे. भाजपच्या माजी प्रवक्ता शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांना विविध स्तरांतून धमक्या येत होत्या. याबाबत प्राप्त तक्रारीनुसार त्यांना सुरक्षा देण्याची मागणी केली जात होती. त्या आधारे नुपूर शर्मा यांना सुरक्षा प्रदान केल्याचे दिल्ली पोलिसांती एका अधिकाऱ्यांने म्हटले आहे.

ट्विट

दरम्यान, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे की, नुपूर शर्मा यांच्या विरोधात मुंबई पोलिसांमध्ये गुन्हा दाखल आहे. पोलीस चौकशी करत आहेत. प्रसारमाध्यमांनी शर्मा यांना अटक करण्याबाबत विचारले असता वळसे-पाटील म्हणाले, पोलीस चौकशी करत आहेत. चौकशी केल्यानंतर जी कारवाई आवश्यक आहे ती केली जाईल.