Mumbai's Mahalakshmi Temple: मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरातील (Mumbai Mahalakshmi Temple) देवतांचे 40 वर्षांपासून साचलेले सिंदूरचे अनेक थर काढून टाकण्यात आले आहेत. यामुळे देवतांचे मूळ रुप भक्तांच्या डोळ्यांचे पारण फेडत आहे. महालक्ष्मी मंदिरात गेल्या 13 दिवस हिंगुळी विधी झाला. या विधीत मूर्तीवरील सिंदूरचे अनेक थर काढण्यात आले आहेत. हिंगुळी विधीसाठी मंदिराचे आतील गाभारा बंद करण्यात आला होता. भुलाभाई देसाई रोडवर असलेल्या मंदिराचे आतील गर्भगृह 7 ते 19 फेब्रुवारी दरम्यान हिंगुळी नावाच्या विधीसाठी बंद ठेवण्यात आले होते. 20 फेब्रुवारी रोजी गर्भगृह पुन्हा उघडण्यात आले.
हिंगुळी विधी दरम्यान, देवी आणि इतर देवतांच्या मूर्ती असलेल्या गाभाऱ्यामध्ये किंवा मंदिराच्या आतील गर्भगृहात प्रवेश करण्यास परवानगी नव्हती. भक्तांना केवळ गाभाराच्या बाहेरील रिंगमधून देवतांची प्रतिमा दिसू शकते. 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 6.00 वाजता गर्भगृह पुन्हा उघडण्यात आले. दिवसा देवतांना कापड, दागिने आणि सोन्याचा मुखवट्याने सजवले जाते. देवतेच्या या अलंकाराला शृंगार म्हणतात. (हेही वाचा- Mumbai AC Bus: मुंबईत आणखी अडीच हजार एसी बस बेस्टच्या ताफ्यात होणार दाखल, दोन कोटींचं एक गाडी)
दरम्यान, रात्री 10.00 वाजता गाभाऱ्याचा दरवाजा बंद होण्यापूर्वी भाविकांना आणखी 30 मिनिटे दर्शन घेण्याची परवानगी आहे. अशा वेळी भक्तांना मूर्ती त्यांच्या मूळ दगडी स्वरूपात पाहायला मिळू शकतात. मंदिराचे व्यवस्थापक नितीन कांबळी यांनी सांगितले की, विधीच्या वेळी लेप (पेस्ट) म्हणून मूर्तींना लावले जाणारे सिंदूर 40 वर्षांहून अधिक काळ थरांमध्ये जमा झाले होते. आता तुम्ही 30 वर्षांपूर्वीचे देवतेचे मूळ रूप पाहू शकता. (हेही वाचा -Mumbai Road Cleaning: मुंबई महापालिकेकडून स्वच्छतेवर अधिक भर, पूर्व-पश्चिम द्रुतगतींच्या सफाईसाठी 180 कोटींचा प्रस्ताव)
मंदिरात आदिशक्ती महालक्ष्मीच्या तीन फूट उंच मूर्ती आहेत. मूर्तीला लावण्यात येणारा सिंदूर धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. हा सिंदूर अभिषेक विधीच्या वेळी देवतांना अभिषेक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्यांपैकी हे एक आहे. वापरल्या जाणाऱ्या इतर पदार्थांमध्ये दूध, पाणी आणि मध यांचा समावेश होतो. हा सिंदूर थरांमध्ये गोळा होतो. तो वेळोवेळी काढावा लागतो. शृंगारशिवाय मूर्तींचे छायाचित्रण करण्यास परवानगी नाही. त्यामुळे मूळ मूर्तींच्या दर्शनासाठी भाविकांना रांगेत उभे राहावे लागेल.