AC Double Decor bus

मुंबईत (Mumbai) सिंगल आणि डबल डेकर नॉन एसी (Non AC) बसची जागा आता एसी बस गाड्यांनी घेतली. प्रवाशांच्या पसंतीस असलेली नॉन एसी डबल डेकर बस कालबाह्य झाल्यानंतर ई-डबल डेकर बस प्रवाशांसाठी धावू लागल्या आहेत. या सेवा अधिकाधिक प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून ताफा वाढवण्याचा आणि काही नव्या मार्गांवर या गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. वर्षभरापूर्वी प्रवाशांच्या सेवेत आलेल्या डबल डेकर ई-बसची संख्या सध्या 50 आहे. यापैकी 30 डबल डेकर बस फोर्ट, नरिमन पॉईंट, कफ परेड या भागांतून धावत आहेत. सध्या बेस्टच्या ताफ्यातील सर्व डबल डेकर बस भाडेतत्त्वावर असून येत्या काही महिन्यांत त्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने (BEST) घेतला आहे.  (Mumbai Road Cleaning: मुंबई महापालिकेकडून स्वच्छतेवर अधिक भर, पूर्व-पश्चिम द्रुतगतींच्या सफाईसाठी 180 कोटींचा प्रस्ताव)

मुंबईत मुंबई शहरातील फोर्ट, नरिमन पॉईंट, कफ परेड भागात 30 डबल डेकर एसी बस धावत आहेत. 20 डबल डेकर बस उपनगरात कुर्ला डेपो ते वांद्रे कुर्ला संकुल, कुर्ला ते अंधेरी,अंधेरी पूर्व स्थानक ते सिप्झमध्येही उपलब्ध आहे. दररोज सरासरी 50 हजारपेक्षा अधिक प्रवासी ई डबल डेकर बसमधून प्रवास करतात.

बेस्ट उपक्रमाकडून एसी डबल डेकरचा ताफा वाढवण्यावर भर दिला जात आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी एप्रिल-मे महिन्यापर्यंत आणखी 200 डबल डेकर बस दाखल करण्याचे उद्दिष्ट आहे. बेस्ट उपक्रमाने डबल डेकर बससाठी काही नवीन मार्गाचीही निवड केली आहे. यात मार्गिका क्रमांक 123 चा समावेश आहे. जे यापूर्वी आरसीएस चर्चेत ताडदेव व तेथून मरीन ड्राईव्हपर्यंत होती.