death representative pc pixabay

Passenger Dies In Flight: मुंबई रांची इंडिगो विमानात एका प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या विमानात प्रवाशाला अचानक रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे विमान नागपूर येथील बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लॅंडींग करण्यात आले. सोमवारी रात्री ८च्या सुमारास ही घटना घडली आहे. प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. मुंबई हून रांची येथे जाणाऱ्या विमानात ही घटना घडली.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डी तिवारी असे विमानात मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशाचे नाव आहे. तो सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मुंबई ते रांची इंडिगोच्या फ्लाइटमध्ये प्रवास करत होते. डी तिवारी यांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. ही घटना क्रू ला कळल्यावर त्यांनी याची माहिती पायलटला दिली. यानंतर पायलट इन कमांडने नागपूरला या विमानाच्या आपत्कालीन लॅंडींगचा निर्णय घेतला. यानंतर या प्रवाशाला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

 या घटनेमुळे प्रवाशामध्ये मोठी खळबळ उडाली. उलट्या झालेल्या प्रवाशांला वैद्यकिय उपाचारासाठी नागपुर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्दैवाने डॉक्टारांनी त्याना मृत घोषित केले. पोस्टमॉटर्म अहवाल आल्यानंतर या बाबत माहिती मिळणार आहे.