Ecstasy Pills Seized (Photo Credits: ANI/Twitter)

मुंबईच्या NCB (Narcotics Control Bureau) युनिटने मुंबईतील दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून एकूण 3,056 एस्टेसी गोळ्या (986 ग्रॅम) जप्त केल्या आहेत. बेल्जियममधून हे ड्रग्ज मुंबईत आणणा-या नवी मुंबईतली एका दाम्पत्याला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो चे उपसंचालक केपीएस मल्होत्रा (KPS Malhotra, Deputy Director (Ops), Narcotics Control Bureau) यांनी दिली आहे. आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून याबाबत अधिक तपास घेत आहेत.

नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो च्या मुंबई झोनल युनिटने ही धडक कारवाई केली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच NCB सापळा रचून नवी मुंबईतील दाम्पत्याला अटक केली आहे. यांनी बेल्जियममधून 3,056 एस्टेसी गोळ्या मुंबईत आणल्या होत्या. Nhava Sheva: नावा शेवा बंदरातून एक हजार कोटी रुपये किमतीचे 191 किलो ड्रग्ज जप्त

दरम्यान काही दिवसांपूर्वी न्हावा शेवा बंदरात (Nhava Sheva Port) कस्टम (Customs) अधिकाऱ्यांना अंमली पदार्थांचा मोठा साठा आढळून आला होता. तब्बल 191 किलो वजनाचे आणि सुमारे 1000 कोटी रुपये किमतीचे हे ड्रग्ज (Drugs) अफगानिस्तानमधून भारतात आणण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली. नवी मुंबई (Navi Mumbai) परिसरात येणाऱ्या या ठिकाणाहून कस्टम अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली होती.