काँग्रेस (Congress) पक्षात आता कुठे जोश भरत असल्याचे चित्र असतानाच मुंबई काँग्रेस (Mumbai Congress) पक्षातील अंतर्गत धूसफूस पुढे आली आहे. युवा काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष सूरज सिंह ठाकुर (Suraj Singh Thakur) यांनी राजीनामा दिला आहे. मुंबई महापालिका निवडणूक (Mumbai Municipal Election 2019) तोंडावर येऊन ठेपलेली आहे. काँग्रेसचे प्रमुख नेते स्वबळाची भाषा करत आहेत. अशात मुंबई युवा काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर गटबाजी उफाळल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे मिळून तिन पक्षांचे सरकार आहे. महाविकासआघाडी करुन हे सरकार सत्तेत आले आहे. मात्र, मुंबई महापालिका निवडणूक स्वतंत्र लढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.
काँग्रेस पक्षाने मंगळवारी (25 ऑगस्ट) सायंकाळी मुंबई युवा काँग्रेस अध्यक्ष पद जाहीर केले. या पदावर माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचा आणदार जीशान सिद्दीकी यांची निवड झाली. तर माजी NSUI मुंबई अध्यक्ष सूरज सिंह ठाकुर यांना कार्यकारी अध्यक्ष बनविण्यात आले. (हेही वाचा, काँग्रेसच्या 'या' नेत्याचे मंत्रीपद रद्द करा; आशिष देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी)
दरम्यान, यूवा काँग्रेस पदासाठी झालेल्या निवडीवेळी जीशान सिद्दीकी आणि सूरज सिंह ठाकूर हे मुख्य दावेदार होते. यात पक्षाने जीशान यांच्या अध्यक्ष दावार शिक्कामोर्तब केले. आता आमदार जिशान सिद्दीकी यांचे स्पर्धक असलेलेल कार्यकारी अध्यक्ष सूरज सिंह ठाकुर यांनी बंड केले असून, त्यांनी आपला राजीनामा राहुल गांधी यांनाही पाठवला आहे. सूरज ठाकूर हा युवा काँग्रेसचा एक आक्रमक तसेच मुंबईतील उत्तर भारतीय काँग्रेसचा प्रमूख चेहरा म्हणून ओळखला जातो. 14 वर्षांची मेहनत पक्षाने दूर्लक्षीत केली. ही बाब आपल्या मनाला लागल्यामुळे आपण राजीनामा दिल्याचे सूरज ठाकूर यांचे म्हणने आहे. दरम्यान, आपण राजीनामा दिला असला तरी पक्षासाठी काम करत राहू असेही सूरज ठाकूर यांनी म्हटले आहे.
ट्विट
आदरणीय @RahulGandhi जी,
मेरे लिए आप सर्वोच्च हैं, मेरी कर्तव्यनिष्ठा पार्टी के लिए एक कार्यकर्ता के तौर पर सदैव बरकरार रहेगी!
पर मैं मुंबई युवा कांग्रेस के कार्यकारी अध्यक्ष के पद से इस्तीफ़ा दे रहा हूं।
आपका आज्ञाकारी
सूरज सिंह ठाकुर pic.twitter.com/R7gpKJjDvI
— Suraj Thakur (@SurajThakurINC) August 25, 2021
दरम्यान, यूवा काँग्रेसचे नवनिर्वाचीत अध्यक्ष जीशान सिद्दीकी यांनी म्हटले आहे की, जर काही मतभेद असतील तर भेटून दूर करता येतील. सूरज हे माझे चांगले मित्र आहेत. मतभेद बाजूला ठेऊन मुंबई महापालिका निवडणूक हे आमचे प्रमुख ध्येय असल्याचे सिद्दीकी यांनी म्हटले आहे.