काँग्रेसच्या 'या' नेत्याचे मंत्रीपद रद्द करा; आशिष देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
काँग्रेस पक्षाच्या एका नेत्याने आपल्याच पक्षातील मंत्र्यावर कारवाई करण्याची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. मंत्री सुनील केदार यांच्या विरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी काँग्रेस नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी केली आहे.
काँग्रेस (Congress) पक्षाच्या एका नेत्याने आपल्याच पक्षातील मंत्र्यावर कारवाई करण्याची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना लिहिले आहे. मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांच्या विरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी काँग्रेस नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी केली आहे. बँकेचे दीडशे कोटी रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी सुनील केदार आणि 10 आरोपींविरुद्ध महाराष्ट्र राज्याच्या सहकार खात्याने कोर्टात खटला दाखल केला आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांचे मंत्रीपद रद्द करण्याची मागणी केली आहे. (Coronavirus in Maharashtra: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात आणीबाणी लागू करावी' काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख यांची मागणी)
गेली 19 वर्षे हा खटला कोर्टात सुरु असून या प्रकरणी सरकारी वकील म्हणून असिफ कुरेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असिफ कुरेशी काँग्रेसच्या लीगल सेलचे अध्यक्ष असल्याने या खटल्यात ते योग्य बाजू मांडू शकत नाहीत, त्यामुळे असिफ कुरेशी यांची नेमणूक रद्द करावी अशी मागणी देखील आशिष देशमुख यांनी केली आहे.
2014 मध्ये नागपुरातील काटोल विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून आमदार होते. राष्ट्रवादीचे उमेदवार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पराभूत करत त्यांनी विजय मिळवला होता. आशिष देशमुख हे अनिल देशमुख यांचे पुतणे आहेत. तर महाराष्ट्र काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी कॅबिनेट मंत्री रणजीत देशमुख यांचे पुत्र आहेत.
2019 मध्ये आशिष देशमुख यांनी विधानसभा निवडणुका जवळ असताना काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात त्यांनी नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली. परंतु, त्यात त्यांचा पराभव झाला.
(The above story first appeared on LatestLY on Aug 23, 2021 10:09 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

