फोनवर (Cellphone) बोलताना भान राहिले नसल्याने इमारतीच्या गच्चीवरुन (Building Terrace) पडून एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. मुंबई (Mumbai) येथील नालासोपारा (Nalasopara) परिसरात ही घटना घडली. श्रुती भुपेश पांडे असे या तरुणीचे नाव असून ती 19 वर्षांची असल्याचे समजते. नालासोपारा येथील सेंट्रल पार्क परिसरात असलेल्या रजनी अपार्टमेंटमध्ये ही तरुणी निवासाला आहे. याच इमारतीच्या गच्चीवरुन बोलताना तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. तिचे प्राण वाचले आहेत मात्र गंभीर दुखापतीमुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
श्रुती पांडे ही तरुणी रविवारी (11 ऑगस्ट) सायंकळी घराच्या गच्चीवर फोनवर बोलत होती. फोनवर बोलताना ती गच्चीवर येरझारा मारत होती. अचानक तिच्या हातातून फोन सटकला आणि खाली पडला. फोन पकडण्याच्या नादात असलेल्या श्रुतीचा तोल गेला आणि तिसुद्धा फोनपाठोपाठ खाली पडली. या इमारतीचे काम सुरु होते. त्यामुळे इमारतीला पत्र्याचे ग्रील लावले आहे. ग्रीलसाठी लावण्यात आलेल्या पहिल्या मजल्यावरील लोखंडी ग्रीलवर श्रुती पडली. त्यामुळे ती थेट जमीनीवर आपटली नाही. त्यामुळे तिच्या जीविताला धोका पोहोचला नाही. मात्र,ती गंभीर जखमी झाली. (हेही वाचा, Gang Rape: नालासोपारा येथे 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार)
ट्विट
Video: मोबाईलवर बोलताना गच्चीवरून पडली १९ वर्षीय तरुणीhttps://t.co/l37MSc7out < येथे वाचा नालासोपाऱ्यामधील धक्कादायक घटनेचा संपूर्ण तपशील#vasai #virar pic.twitter.com/NQYKgNwYfI
— LoksattaLive (@LoksattaLive) September 12, 2022
दरम्यान, श्रुती ज्या ठिकाणी पडली ते ठिकाण अडगळीचे असल्याने तिला बाहेर पडता येत नव्हते. परिणामी आरडाओरडा करण्याव्यतीरिक्त ती काहीच करु शकली नाही. आरडाओरडा ऐकून इमारतीत वास्तव्यास असणाऱ्या रहिवास्यांचे लक्ष गेले. रहिवाशांनी तातडीने अग्निशमन दलाला फोन केला आणि ते श्रुतीच्या मदतीसाठी धावले. दरम्यान, अग्निशमन दलाची वाट न पाहता इमारतीतील तरुणांनी श्रुतीला मदत करण्यासाठी पत्र्यावर धाव घेतली. या वेळी श्रुती ही तिच्या आजीची आठवण काढत मला फार दुखतंय’ असं म्हणत होती. दरम्यान, पत्र्याच्या शेडजवळच्या रुमचं ग्रील तोडून तिला बाहेर काढण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले.