महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या विरोधात लढायचे असल्यास घरीच थांबा असे आवाहन करण्यात आले आहे. तर कोरोनाग्रस्त रुग्णांवर दिवसरात्र वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स यांच्याकडून उपचार केले जात आहेत. आज मुंबईत भारताच्या नौदल, वायू आणि सैन्याकडून कोरोना वॉरियर्सवर पुष्पवृष्टी करुन त्यांच्या कामाला सलाम केला आहे. याच दरम्यान, आता मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलन येथील एमएमआरडीच्या मैदानावर कोरोना संक्रमित रुग्णांसाठी रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा हा मुंबईत सर्वाधिक आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी विविध ठिकाणी क्वारंटाइन सेंटर उभारली जात आहेत. तसेच महापालिकांच्या शाळा सुद्धा क्वारंटाइन सेंटर म्हणून वापरण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. एमएमआरडीच्या मैदानात 1 हजार बेड्सचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे.(Lockdown 3.0: रेड झोनमध्ये काही अटींच्या आधारावर दारुच्या दुकानांसह Standalone Shops सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाची परवानगी; कन्टेंमेंट झोनमध्ये मात्र नियम कडक)
Maharashtra: Mumbai Metropolitan Region Development Authority begins the work of constructing a 1000 bedded #COVID19 hospital at MMRDA ground in Bandra Kurla Complex. pic.twitter.com/6gk7sPCTrA
— ANI (@ANI) May 3, 2020
दरम्यान, मुंबईत देशभरातील 20 टक्के कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे आता कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणांची चिंता अधिकच वाढली आहे. मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 7 हजारांच्या पार गेला आहे. देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने येत्या 17 मे पर्यंत लॉकडाउनचे आदेश कायम ठेवण्यात आले आहेत.