राज्यात थंडीचा जोर दिवसेंदिवस वाढत चालल्याने धुक्याचे वातावरण सकाळच्या वेळेस पहायला मिळत आहे. तर मुंबईत थंडीतील तापमानाचा पारा 15.5 अंशावर गेल्याने नागरिक चांगलेच कुडकुडले आहे. सर्वाधिक कमी तापमान शनिवारी अहमदनगर येथे 10.3 अंश सेल्सिअस झाले होते. यंदाच्या थंडीच्या मौसमातील मुंबईतील तापमानाचा पारा अगदीच खाली गेल्याचे दुसऱ्यांचा दिसून आले आहे. नवं वर्षाच्या सुरुवातीला मुंबईतील तापमानाचा पारा 15.3 अंश सेल्सिअसवर पोहचला होता.
हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील काही ठिकाणी गेल्या 24 तासात तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. तर गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे हवामान कोरडे असल्याचे दिसून आले. वातावरणातील गारवा कायम असल्याने थंडीची झळ अधिकच बसत आहे. त्यामुळे नागरिक थंडीपासून बचाव करण्यासाठी कानटोप्या, स्वेटरचा आधार घेत आहेत. शनिवारी मुंबईतील तापमान 19 अंश सेल्सिअस होते.(मुंबई मध्ये स्थिरावणारी थंडी खराब करतेय हवेची गुणवत्ता; BKC, बोरिवली मध्ये AQI निच्चांकांवर!)
तर शुक्रवारी मुंबईच्या कमाल तापमानात घट नोंदवण्यात आली होती. त्यावेळी तापमान 27.8 आणि कुलाबा येथे 27.2 अंश सेल्सिअस झाले होते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून उत्तरोत्तर कमाल आणि किमान तापमानात होणारी घट थंडी आणखी भर घालत आहे. सर्वात कमी तापमान शुक्रवारी चंद्रपूर येथे 7.6 अंश सेल्सिअस होते.