Cold | Photo Credits: PTI

महाराष्ट्रात मुंबई शहरामध्ये आता हळूहळू थंडीचा पारा खालावत आहे. दरम्यान यामुळे आता शहरातील हवा खराब होत आहेत. बुधवारी (2 जानेवारी) एअर क्वॅलिटी इंडेक्स (Air Quality Index) 204 होता तर गुरूवारी हा इंडेक्स 247 वर पोहचला होता. दरम्यान मुंबईत बोरिवली (Borivali), वांद्रेतील बीकेसीमध्ये (Bandra BKC) हवेचा दर्जा अत्यंत खराब पातळीवर गेला आहे. Maharashtra Weather Update: महाराष्ट्रासह मुंबईही गारठली; कमाल तापमानाचा पारा घसरला.  

AQI नुसार, 201 ते 300 या एअर क्वॅलिटी इंडेक्स मधील हवेचा दर्जा हा खराब मानला जातो. System of Air Quality and Weather Forecasting and Research (Safar) च्या माहितीनुसार, वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये हवेचा दर्जा 306 तर बोरिवली मध्ये 303 आहे. मुंबईतील सर्वात कमी हवेतील प्रदुषणाची पातळी भांडुपमध्ये आहे. भांडूपचा AQI 120 आहे.

मुंबई शहरामध्ये निच्चांकी तापमान 15अंश सेल्सियसच्या आसपास होते. मागील काही दिवसामध्ये वातावरणामध्ये पुन्हा उष्णाता वाढली. वेधशाळेच्या अंदाजानुसार, आता 5 जानेवारीनंतर मुंबईमध्ये पुन्हा थंडीचा पारा खालावणार आहे. गुरूवारी (2 जानेवारी) दिवशी मुंबईशहरात किमान तापमान 17 अंश इतके होते. तर नवी मुंबईत पनवेलामध्ये 12 अंश इतके तापमान खालावले होते.