मुंबई मॉन्सून अपडेट (Photo Credit: ANI)

महाराष्ट्रात यंदा 9 जूनला मान्सून दाखल झाला असून पहिल्या दिवसापासुनच त्याची दमदार बॅटिंग सुरू असल्याने मुंबईकरांची मागील काही दिवसांत त्रेधा तिरपीट उडाली आहे. कोरोना संकटाशी दोन हात करत असलेल्या मुंबईला आता मुसळधार पाऊस, सचल भागात पाणी साचल्याने होणारा त्रास यामुळे पुन्हा ब्रेक लागला आहे. आजपासून पुन्हा पुढील 3 दिवस मुंबई शहरात पावसाचा वेग वाढणार असल्याचं मुंबई महानगर पालिकेने सांगितलं आहे. त्यामुळे या दिवसांत विनाकारण घराबाहेर पडू नका. समुद्र किनारी फिरणं टाळा असा सल्ला दिला आहे. Mumbai Rains Update: मुंबईत रात्रीपासून विजांच्या कडकडाटासह पावसाची कोसळधार, अनेक भागांत वॉटर लॉगिंगची समस्या.

आजचा यंदाच्या मान्सून मधील मुंबईकरांचा पहिलाच विकेंड आहे पण पावासाचं आणि पावसाचं वातावरण पाहता या मोसमाचा आनंद घरातच राहून घ्यावा असा सल्ला मुंबईकरांना देण्यात आला आहे. मुंबई मध्ये पुढील 24 तासाकरिता शहर व उपनगरांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर आज भरती दुपारी 1 वाजून 32 मिनिटांनी असेल. या वेळी अंदाजे 4.34 मीटर उंचीच्या लाटा उसळतील असा अंदाज आहे तर ओहोटी संध्याकाळी 7 वाजून 27 मिनिटांनी आहे. त्यावेळी लाटा 1.89 मीटरच्या असू शकतात.

बीएमसी ट्वीट

हवामान विभागाचे के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे भागात अति मुसळधार पावसाची नोंद मागील 24 तासांत करण्यात आली आहे. यामध्ये आज सकाळी 8.30 पर्यंत बोरिवली मध्ये 132 मीमी, ठाण्यात 109.2 मीमी, टीएमसी 123.6 मीमी, मुंबईच्या सांताक्रुझ मध्ये 107 मीमी पावसाची नोंद झाली आहे. यामधील निम्मा पाऊस रात्री बरसला आहे. त्यामुळे सकाळी सखल भागात पाणीच पाणी साचलेले बघायला मिळाले आहे.