Mumbai Weather Prediction,July19 : भारतीय हवामान खात्यानेआज (IMD)मुंबई शहरासाठी ‘यलो’ अलर्ट जारी केला आहे. आज सकाळी मुंबईच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. मुंबईत आज एकाकी भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, मुंबई शहराचे आजचे तापमान सरासरी किमान 23 सेल्सिअस ते कमाल 30 सेल्सिअस इतके राहणार आहे. गांधी मार्केट, दादर, हिंदमाता, परळ, अंधेरी भुयारी मार्ग आणि सायनसह अनेक भागात पावसामुळे वाहतूक कोंडी झाली होती. गुरुवारी सकाळी साडेसात वाजता संपलेल्या गेल्या २४ तासांत मुंबईतील कुलाबा हवामान केंद्रात ८३ मिमी पावसाची नोंद झाली. याच कालावधीत माटुंगा स्थानकात 89 मिमी पावसाची नोंद झाली आहे, असे IMDने म्हटले आहे. भारतीय हवामान खात्याने सांगितले की, मान्सून या आठवड्यात केरळ, कर्नाटक आणि कोकण गोव्याच्या किनारपट्टीवर पोहोचेल. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि गडगडाटी वादळाचा अंदाज आहे, असे IMD ने म्हटले आहे. हवामान खात्याच्या अंदाजनुसार आज आणि उद्या दोन्ही दिवस मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आता मुंबईत उद्याचे हवामान कसे असतील यासाठ हवामान खात्याने मुंबईत उद्याचा हवामान अंदाज लावला आहे. हेही वाचा: Weather Forecast Mumbai: मुंबईत दमदार पाऊस, पुढचे 4-5 तास महत्त्वाचे; लोकल रेल्वे सेवेस विलंब, सकल भागात साचले पाणी; जाणून घ्या हवामान अंदाज
मुंबईत उद्याचे हवामान कसे?
भारतीय हवामान खात्याने सांगितले की, मान्सून खाली सरकण्यास सुरुवात झाली आहे आणि या आठवड्यात केरळ, कर्नाटक आणि कोकण गोव्याच्या किनारपट्टीवर पोहोचेल. येत्या काही दिवसांत या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि गडगडाटी वादळाचा अंदाज आहे, असे IMD ने म्हटले आहे. केवळ मुंबईच नव्हे तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्यातही पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळत आहे. परिणामी या सर्व जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात विविध ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे. संपूर्ण विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शहरांमध्ये मुसळधार पावसाने काहीसी नागरिकांची गैरसोय होत असली तरी, राज्यात बळीराजा मात्र सुखावल्याचे चित्र आहे. विविध ठिकाणी शेतीच्या कामांना वेग आला आहे.