Mumbai Weather Prediction, August 01: भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, आज 31 जुलै रोजी मुंबईत मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि साधारणपणे ढगाळ आकाश असेल. कमाल तापमान 30 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचण्याचा अंदाज आहे, तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. ऑगस्टपासून पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. 3 ऑगस्ट पासून मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. यामुळे अनेक धरण आणि तलाव क्षेत्रातील पाणीसाठ्यातही वाढ झाली. या वेळी, वेळेच्या आदीच मुंबईत पावसाने हजेरी लावली.मुंबईत सुरुवातीला रिमझिम पावसाच्या सरी बरसल्या. त्यानंतर मात्र पावसाने जोर वाढला. काही दिवसानपूर्वी मुंबईत मुसळधार पाऊस झाला. यामुळे जनजीवनही विस्कळीत झाले होते. मात्र आता गेले दोन तीन दिवस पावसाचा वेग कमी झाल्याचे पाहायला मिळते आहे. पण ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.आता मुंबईत उद्याचे हवामान कसे असतील यासाठी हवामान खात्याने मुंबईत उद्याचे हवामान याचा अंदाज लावला आहे.हेही वाचा: Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; गुरुवारपासून कोकण, पुणे, कोल्हापूर परिसरात जोर वाढण्याची शक्यता
मुंबईत उद्याचे हवामान कसे?
महाराष्ट्रात पुढील पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता असून, अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने हवामानाचा इशारा जारी केला आहे, ज्यात गुरुवारपासून विशेषतः कोकण, पुणे आणि कोल्हापुरात मोठ्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस गडगडाटी वादळासह विजांचा कडकडाट तसेच मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.