Maharashtra Weather Update: गेले काही आठवडे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सतत मुसळधार पाऊस सुरु आहे. मात्र आता पुढील काही दिवस तरी या पावसाची उसंत थांबवणार नसल्याचे दिसत आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रासाठी पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. गुरुवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आजदेखील, कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस गडगडाटी वादळासह विजांचा कडकडाट तसेच मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. (हेही वाचा: Sinhagad Fort: पुण्यात सिंहगड घाटात कोसळली दरड; किल्ल्यावर जाणारा रस्ता बंद Video)
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज-
कोंकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 30, 2024
30 th Jul: हवामान खात्याने महाराष्ट्रासाठी पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. गुरुवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
IMD pic.twitter.com/FccJz0BFwF
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 30, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)