बीएमसी कडून आज 30 मे पासून मुंबई शहरात 5% पाणी कपात जाहीर केली आहे. यंदाच्या तीव्र उन्हाळ्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने तलावातील पाण्याने विक्रमी तळ गाठला आहे. 5 जून पासून पालिका ही पाणी कपात 5% 10% करणार आहे. सध्या मुंबईच्या तलावांमध्ये 10% पेक्षाही कमी पाणीपुरवठा राहिला असल्याने ही पाणीकपात लागू केली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या नागरिकांना काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
बीएमसी कडून पाणी कपात
🚰पाणी बचतीचे उपाय अंगीकारणे सहज शक्य आहे. कृपया पाण्याचा काटकसरीने वापर करा आणि शक्य तेवढी पाणी बचत करा.
💧बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रयत्नांना सहकार्य करावे, ही नम्र विनंती.
---
🚰It's easy to adopt water-saving measures. Save as much water as possible.
💧Use water… pic.twitter.com/O5qPcNYXfq
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 25, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)