Baby | Representational image (Photo Credits: pxhere)

Mumbai News:  आई होणं या जगातलं सर्वात मोठं स्वर्ग सुख आहे. पण जर आपल्या जन्मत: बाळाची अदला बदल झाली तर ? आईवर आणि संपुर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळतो. त्यात तर मुलाची अदला बदल झाली तर काय खर नाही. एक अशीच घटना मुंबईतील प्रभादेवी येथे घडली आहे. परळच्या वाडिया (Wadia) रुग्णालयात नवजात बाळाची अदला बदल केल्याप्रकरणी लेबर वाॅर्डमधील डॉक्टर आणि नर्सवर गुन्हा दाखल झाला आहे. भोईवाडा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

कुटुंबाचा दावा आहे की आईनं मुलाला जन्म दिल आणि मुलगी सोपवण्यात आली. त्यानंतर नवजात बाळ आणि पालक यांच्या खासगी लॅबमध्ये डीएनए तपसण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर डीएनए जुळत नसल्याने कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार केली. बाळंतपणाच्या वेळी आई बेशुध्द होती, जन्मलेल्या मुलाला आयसीयुमध्ये हलवण्यात आले त्यानंतर मुलाची अदलाबदल करण्यात आली. अशी तक्रार महिलेने पोलिस ठाण्यात दिली.

पोलिसांनी या प्रकरणी डॉक्टर, नर्स आणि इतरांविरुद्ध कलम ३३६ आणि ३४ अन्वये एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, गांजेजीची डिलिव्हरी झाली त्यादिवशी तेथे उपस्थित असलेल्या सर्वांचे जबाब घेण्यात येणार आहेत. दाम्पत्य आणि मुलाचे डीएनए नमुने कलिना लॅबमध्ये पाठवण्यात येणार आहेत. या जोडप्याने आयव्हीएफ उपचार घेतले होते. १६ वर्षानंतर मुलं झाले होते.