SSC Exams 2019: नवी मुंबईतील विवेकानंद इंग्लिश स्कूल (Vivekanand English School) शाळेतील एका शिक्षिकेने दहावीच्या (SSC) 7 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका (Answer Sheet) गहाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये त्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. ऐरोली येथे राहणार्या 38 वर्षीय शिक्षिकेने उत्तरपत्रिका शाळेत तपासल्या .त्यानंतर वाशी येथील एसएसएसीच्या कार्यालयात उत्तर पत्रिका नेताना त्या गहाळ झाल्या आहेत. हा प्रकार 12 मार्च दिवशी झाला असून 15 मार्चला त्याबाबत तक्रार नोंदवण्यात आली आहे.
दहावीच्या पुर्नपरीक्षेला बसलेल्या इंग्रजी विषयाच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गहाळ झाल्या आहेत. टाईम्स ऑफ़ इंडियाच्या वृत्तानुसार, शिक्षिका तपासलेल्या उत्तरपत्रिकाचा गठ्ठा घेऊन जमा करण्यासाठी वाशी येथील बोर्डाच्या कार्यालयात येत होत्या. त्यावेळी रिक्षा प्रवासात सात उत्तरपत्रिका गहाळ झाल्याचे रबाळे एमआयडीसी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी सांगितले आहे. उत्तरपत्रिका हरवल्याचं लक्षात आल्यानंतर शिक्षिकेने स्वतः त्या उत्तरपत्रिका शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र कुठेच न सापडल्याने अखेर त्यांनी पोलिस तक्रार केली. SSC, HSC Exam Result 2019: 12 वीचा निकाल 20 मे नंतर,10 वीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात mahahsscboard.maharashtra.gov.in वर लागणार
मुंबई डिव्हिजन बोर्ड ऑफिसकडून संबंधित शिक्षिके कडून उत्तरपत्रिका गहाळ झाल्याच्या प्रकारावर एक चौकशी समिती नेमण्यात आली आहे. त्याचा अहवाल पाहून पुढील कारवाई ठरवली जाईल असे सांगण्यात आले आहे. जर उत्तरपत्रिका सापडल्या नाही तर विद्यार्थ्यांना इतर विषयात मिळालेल्या मार्कांनुसार सरासरी मार्क दिले जातात. त्यानुसार विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल लावला जातो.