मुंबई: महिलेवर बलात्कार करत मुलांनासुद्धा खोलीत कोंडले, पोलीस अधिकाऱ्याला ठोठावल्या बेड्या
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मुंबईत (Mumbai) घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार करत तिच्या मुलांना खोलीत कोंडून ठेवल्याचा प्रकार एका पोलीस अधिकाऱ्याने केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आले असून त्याचे निलंबन केले आहे.

विक्रोळी येथील कन्नमवार नगर मध्ये ही घटना घडली असून प्रफुल्ल आगवणे असे पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. तर कांजुरमार्ग पोलीस स्थानकात आगवणे हा पोलीस उपनिरक्षकाच्या पदावर कार्यरत आहे. आगवणे यांच्या घरी पीडित महिला वर्षभर घरकाम करण्यासाठी येत होती. मात्र शनिवारी ही महिला आपल्या दोन मुलांना घेऊन घरकाम करण्यासाठी आली होती. त्यावेळी आगावणे हा तिला एका खोलीत घेऊन गेला.(किरकोळ वादातून शेजारणीचा नंबर अश्लील जाहिरातीत टाकणारा इसम पोलिसांच्या तावडीत)

त्यानंतर आरोपीने पीडित महिलेवर बलात्कार केला. तसेच याबद्दल कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीसुद्धा देत तिच्या मुलांना कोंडून ठेवले. मात्र विक्रोळी पोलिसांनी या सर्वांची सुखरुप सुटका केली आहे.