Shiv Sena Leader Nitin Nandgaokar: मुंबईत धंदा करा पण दुकानाचे 'कराची' हे नाव बदला; शिवसेना नेते नितीन नांदगावरकर यांचा व्हिडिओ व्हायरल
Nitin Nandgaokar | (Photo Credits: ANI)

शिवसेना (Shiv Sena) नेते नितीन नांदगावकर (Nitin Nandgaokar) यांचा एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Shiv Sena leader Nitin Nandgaokar) झाला आहे. या व्हिडिओत ते एका मिठाई दुकानदाराला आपल्या दुकानाचे नाव बदलायला सांगताना दिसत आहेत. एनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार ही घटना मुंबई येथील वांद्रे पश्चिम परिसरातील आहे. वांद्रे पश्चिम येथे 'कराची' नावाचे एक मिठाईचे दुकान (Karachi Sweets Shop) आहे. या दुकानाचे नाव बदलण्यासाठी नितीन नांदगावकर सांगत आहेत. मी आपल्याला काही आवधी देत आहे. त्या अवधीमध्ये आपण आपल्या दुकानाचे नाव बदला आणि त्या ऐवजी एखादे मराठी भाषेतील नाव लिहा, असेही नांदगावकर सूचवत आहेत.

दरम्यान, नितीन नांदकावकर हे या आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षात होते. त्यानंतर त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेना पक्षात प्रवेश केला. नितीन नांदगावकर हे गेली अनेक वर्षे विविध प्रकारची आंदोलने करत आहेत. अनेकदा ही आंदोलने हिंसक प्रकारचीही झाली आहेत. नांदगावकर स्वत: अनेकदा दावा करतात की, सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न उपस्थित करतात. त्यांच्या अडचणी दूर होण्यासाठी आवाज उठवतात. नांदगावकर यांना नागरिकांचाही मोठ्या प्रमाणावर पाठिंबा असतो. परंतू, त्यांनी नागरिकांच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी केलेल्या मार्गाचा अवलंब हा अनेकदा हिंसक असतो. त्यामुळे त्यांना नेहमीच कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागते. (हेही वाचा, Nitin Nandgaonkar Receives Death Threats: शिवसेना पक्षाचे आक्रमक नेते नितीन नांदगावकर यांना जीवे मारण्याची धमकी)

नितीन नांदगावकर यांच्यावर विविध पोलिस स्थानकांमध्ये विविध प्रकारच्या तक्रारी दाखल आहेत. काही ठिकाणी गुन्हेही नोंद आहेत. नितीन नांदगावकर यांनी केलेली आंदोलने ही प्रामुख्याने, मराठी भाषा, सर्वसामान्य नागरिकांना लुटणारे रिक्षाचालक, दुकानदार यांच्या विरोधात असतात.

अनेकदा रिक्षा चालक विशिष्ट प्रकारचे यंत्र रिक्षाला लावून ग्राहकाच्या नकळत रिक्षाचे मीटर भाडे वाढवत असतात. त्यांच्याविरोधात नितीन नांदगावरकर आंदोलन करत असतात. दुसऱ्या बाजूला अनेकदा विविध कंपन्या, कार्यालयं कामगार, कर्मचारी यांचे पगार बुडवतात किंवा लटकवतात, अशा लोकांच्या विरोधातही कामगारांच्या बाजूने नांदगावकर मैदानात उतरल्याचे दिसते. परंतू, कायदा हातात घेतल्याबद्दल त्यांच्यावर काही वेळा तडीपारीची कारवाईही करण्यात आली आहे.