मुंबई: घाटकोपर येथे अविवाहित महिलेने नवजात बालकाला इमारतीच्या 6 व्या मजल्यावरुन फेकले; गुन्हा दाखल
Baby (Photo Credits; Pixabay) (Representational image Only)

मुंबई (Mumbai) मधील घाटकोपर (Ghatkopar) येथील एका 25 वर्षीय अविवाहित महिलेने आपल्या नवजात बालकाला इमारतीच्या 6 व्या मजल्यावरुन फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. त्यानंतर या महिलेची प्रकृती बिघडली असल्याने तिला कुपर हॉस्पिटलमध्ये (Cooper Hospital) दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, या बाळाचा जन्म लवपून ठेवण्यासाठी जन्माआधी किंवा जन्मानंतर बाळाला मारण्याचा कट केल्याप्रकरणी पंत नगर (Pant Nagar) पोलिसांनी आयपीसी सेक्शन (IPC Section) 318 अंतर्गत या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या महिलेला दोन वर्षांचा तुरुंगावास किंवा दंड भरण्याची शिक्षा होऊ शकते. अथवा दोन्ही शिक्षा भोगाव्या लागू शकतात.

4 ऑगस्ट रोजी गौरीशंकर वाडीतील इमारतीत ही घटना घडली असून सर्वप्रथम दूध विक्रेत्याने बाळाला रक्ताच्या थरोळ्यात पडलेले पाहिले. त्यानंतर त्याने ही बाब सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आणून दिली. सुरक्षा रक्षकाने तातडीने सेक्रेटरीला या घटनेची माहिती दिली, असे सिनियर इन्स्पेक्टर सुहास कांबळे यांनी सांगितले. गेल्या 5 महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने इमारतीतील कोणती महिला प्रेग्नेंट आहे हे माहिती नाही, अशी माहिती इमारतीतील रहिवाशांनी पोलिसांना दिली आहे. (पुणे: एकतर्फी प्रेमप्रकरणातून एका विवाहित महिलेचा चाकू भोसकून खून; आरोपीचाही आत्महत्येचा प्रयत्न)

डॉक्टारांच्या रिपोर्टनुसार, बाळाच्या डोक्याला जखम झाली असून बाळ जन्मतःच मेलेले नव्हते. त्यानंतर पोलिसांनी हत्या करुन पुरावे नष्ट केल्याप्रकरणी आयपीसी सेक्शन 302 अंतर्गत महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान महिलेने गुन्हाची कबुली दिली आहे. सध्या रुग्णालयात दाखल असलेल्या गुन्हेगार महिलेवर पोलिसांचे बारीक लक्ष आहे.