पुणे: एकतर्फी प्रेमप्रकरणातून एका विवाहित महिलेचा चाकू भोसकून खून; आरोपीचाही आत्महत्येचा प्रयत्न
Image used for represenational purpose (File Photo)

एकतर्फी प्रेमप्रकरणातून एका विवाहित महिलेची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना पुण्यातील (Pune) पिंपरी-चिंचवड (Pimpri- Chinchwad) येथील चिखली (Chikhali) परिसरात शनिवारी दुपारी घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेची हत्या केल्यानंतर आरोपीने स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यात आरोपी गंभीर जखमी झाल्याचे समजत आहे. तसेच त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी चिखली पोलीस अधिक चौकशी करत आहेत. या घटनेने संपूर्ण पुण्यात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

अरविंद शेषेराव गाडे असे 30 वर्षीय आरोपीचे नाव आहे. अरविंदला दोन मुले असून त्याचे त्याचे एका विवाहित महिलेवर एकतर्फी प्रेम होते. त्यामुळे तो मृत महिलेशी वारंवार बोलण्याचा प्रयत्न करित होता. एवढेच नव्हेतर, तिला फोन करून त्रासही देत होता. याबाबत त्या महिलेच्या पतीला कळल्यानंतर त्याने अरविंदची समजूत घातली. परंतु, अरंविदमध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही. त्याचे कृत्य पूर्वीप्रमाणेच सुरु असल्याने अखेर महिलेने तिचा क्रमांक बदलून टाकला. यानंतर संबंधित महिला कामावरून घरी येत असताना अरविंदने तिला भर रस्त्यात अडवून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी दोघात बाचाबाची झाली. यातून अरविंद सोबत आणलेला चाकू तिला भोकसून तिचा खून केला. त्यानंतर अरविंदने त्याच चाकूने स्वतःच्या पोटात वार करीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती लोकसत्ताने दिली आहे. हे देखील वाचा- Nagpur Sugar Factory Blast: नागपूर जवळच्या बेला येथील मानस ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्यात मोठा स्फोट; 5 कामगारांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेला तीन मुले असल्याचे कळत आहेत. आरोपी गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकती चिंताजनक आहे. या प्रकरणी स्थानिक पोलीस अधिक चौकशी करत आहेत.