Blast (Image used for representational purpose only) (Photo Credits: PTI)

नागपूर (Nagpur) जवळच्या बेला (Bela) येथील मानस ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड (Manas Agro Industries) साखर कारखान्यात (Sugar Factory) बायोगॅसच्या टाकीत अचानक मोठा स्फोट झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या स्फोटात 5 कामगार ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. ही भीषण दुर्घटना घटना शनिवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास घडली आहे. या स्फोटाने कारखान्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये एकाच खळबळ उडाली आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला? हे अद्याप स्पष्ट झाले नसून नागपूर ग्रामीण पोलीस यासंदर्भात अधिक चौकशी करत आहेत.

मंगेश प्रभाकर नौकरकर (वय 21) , लीलाधर वामनराव शेंडे (वय 47), वासुदेव विठ्ठल लडी (वय 30), सचिन प्रकाश वाघमारे (वय 24) व प्रफुल्ल पांडुरंग मून (वय 25 ) अशी मृतांची नावे आहेत. स्फोटामध्ये हे पाच जण गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून पाचही जणांना मृत घोषित केले. हे सर्व कामगार वडगाव येथील रहिवाशी असल्याचे समजत आहे. हे देखील वाचा- पालघर: केमिकल कंपनीत स्फोट; 2 कामगारांचा मृत्यू

पीटीआयचे ट्वीट-

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यातील स्फोटाने संपूर्ण नागपूर हादरून गेले आहेत. लॉकडाऊनमुळे गेल्या अनेक दिवसांपासून या साखर कारखान्यातील काम बंद होते. नुकताच हा साखर कारखाना सुरु झाल्याचे समजत आहे.