Uddhav Thackeray Dhadak Morcha (Photo Credits: Twitter/ Shiv Sena)

पिक विमा प्रश्नी आक्रमक झालेल्या शिवसेनेने आज मुंबईमध्ये मोर्चा काढला होता. शेतकर्‍यांना येत्या 15 दिवसामध्ये कर्जमाफी माफ करा असा इशारा पीक विमा कंपन्या आणि बॅंकांना दिला आहे. भगवा आज शेतकर्‍याच्या मागे खंबीरपणे उभा असल्याचं म्हटलं आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपस्थितींना संबोधित करताना मोर्चा बॅंक खात्यातून शेतकर्‍यांची फसवणूक करू नका असं म्हटलं आहे. पुढील 15 दिवसांमध्ये कर्जमाफी प्रकरणं निकालात निघाली नाही तर हा मोर्चा आक्रमक होईल असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.  राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना पीकविम्यासंदर्भात मदत करावी. असेही शिवसैनिकांना आदेश देण्यात आलं आहे. किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा

शिवसेनेचा इशारा    

मुंबईत आयोजित शेतकर्‍यांसाठीच्या मोर्चामध्ये उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे पदाधिकारी, नेते देखील रस्त्यावर उतरले होते. यावेळेस शेतकर्‍यांना त्यांचे हक्क मिळावेत यासाठी शिवसेना पाठीशी आहे. त्यांच्य हक्कांसाठी आम्ही बांधील आहोत असेही म्हटले आहे. कर्जमाफीमध्ये जर काही त्रुटी असतील तर शिवसेना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चेसाठी तयार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यासाठी चर्चेसाठी आम्ही तयार आहोत असेही त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना सांगितलं आहे.

पुढील काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणूका जाहीर होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर आता शिवसेना अधिक आक्रमक झाली आहे. उद्या (18 जुलै) पासून आदित्य ठाकरेचा जनआर्शिवाद दौरा सुरू होणार आहे.