
कोरोनाबाधित रुग्णांसाठी वापरले जाणारे रेमडेसिवीर (Remdesivir) औषधांचा काळाबाजार करणाऱ्या फार्मा कंपनीच्या दोन वरिष्ठ मॅनेजर्सला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, मंगळवारी सत्र न्यायालयाकडून चंद्र प्रकाश गुप्ता याचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यापूर्वीच तो स्वत:हून पोलिसांना शरण गेला. त्यानंतर बुधवारी गुन्हे शाखेच्या युनिट 7 च्या अधिकाऱ्यांनी स्वतंत्र शुक्ला याला ताब्यात घेतले. या दोघांना येत्या 16 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.(Thane Unlock: 15 ऑगस्ट पासून ठाणे येथील सर्व दुकानं दररोज उघडण्यास परवानगी)
गेल्या महिन्यात पोलिसांच्या पथकाकडून सतीश तावरे यांना ग्राहक म्हणून मुलुंड येथील लिबर्टी मेडिकल स्टोर येथे पाठवले. तेथे त्यांनी राहुल गाला आणि त्याचा सहकारी विकास दुबे यांना ताब्यात घेतले. हे दोघे मिळून रेमडेसिवीर औषध प्रत्येकी 30 हजार रुपयांना विकत असल्याचे समोर आले होते. या प्रकरणी अन्य पाच जणांना सुद्धा अटक केली आहे. गुप्ता आणि शुक्ला यांच्याकडून त्यांना आर्थिक पाठपुरवा करण्यात येत होता.
कोरोनाबाधितांसाठी वापरण्यात येणारे हे औषध खरेदी करण्यासाठी आधार कार्डची कॉपी, डॉक्टरांची चिठ्ठीसह रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट द्यावा लागतो. आरोपींनी असे म्हटले की, फार्मा कंपनीला एक अर्ज देणार होते. त्यानुसार औषधांचा काही साठा हा कर्मचारी आणि नातेवाईकांसाठी ठेवणार होते. परंतु त्यांनी आपल्याकडे ठेवण्याऐवजी ग्राहकांना दुप्पट दराने विक्री केले. या दोघांना मोठ्या प्रमाणात नफा सुद्धा झाला. औषधांच्या विक्रीतून मिळत असलेला नफा हा दुसऱ्या औषधाच्या विक्रीपूर्वी एकमेकांमध्ये वाटून घेत होते.(पंढरपूर: एकाच कुटुंबातील तिघांचा Coronavirus संसर्गामुळे मृत्यू, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याचाही समावेश)
पोलिसांच्या मते, हैदराबाद मधील हिटिरो हेल्थकेअर आणि गोव्यातील सिप्लासह काही कंपन्यांनाच भारतात रेमडेसिवीर औषध विक्री करण्याची भारतात परवानगी आहे. हिटोरोज यांच्या इंजेक्शनची मुळ किंमत 5400 आणि सिप्लाच्या 4000 रुपये असल्याचे ही पोलिसांनी म्हटले आहे.