मुंबई लोकल म्हणजे माणसांची गर्दी वाहून नेणारी एक महाकाय यंत्रणा. हीच यंत्रणा वापरुन लाखो मुंबईकर प्रतिदिन प्रवास करत असतात. या प्रवासादरम्यान शिस्त आणि सुरक्षा यांच्याशी केलेली छेडछाड अनेकांच्या जीवावर बेतत (Mumbai Local Train Accident) आहे. अवघे जग नववर्षाचे जल्लोषात स्वागत करत असतानाच मुंबई शहरातील वडाळा रेल्वे स्टेशनामध्ये ( Wadala Station Accident) एक धक्कादायक घटना घडली. वर्षाच्याय पहिल्याच दिवशी येथे मोहन घोलप नावाच्या अवघ्या 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. रहदारीच्या वेळी लोकल ट्रेनला दरवाजात लटकत प्रवास (Train Footboard Inciden) करणे त्याच्या जीवावर बेतले आहे. बुधवारी रात्री ही घटना घडली.
पूल ओलांडत असताना खांबाला धडक
रेल्वे पोलिसांनी (GRP) दिलेल्या माहितीनुसार, चेंबूर येथील रहिवासी असलेला मोहन घोलप हा आपल्या मित्रासोबत कॉटन ग्रीन येथून कामावरून घरी निघाला होता. दरम्यान, आठ वाजून 40 मिनिटांनी लोकल वडाळा पूल ओलांडत असताना रुळांजवळील खांबाला धडकून खाली पडला आणि गंभीर जखमी झाला. त्याचा सहप्रवासी असलेल्या त्याच्या मित्राने ट्रेन थांबवण्यासाठी आपत्कालीन साखळी ओढली. त्यानंतर तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचा जागीच मृत्यू झाला. (हेही वाचा, Mumbai Shocker: लोकल ट्रेनमध्ये चौथ्या सीटवरून झाला वाद; घाटकोपर स्थानकावर अल्पवयीन मुलाने चाकूने वार करून केली 35 वर्षीय व्यक्तीची हत्या)
कॉटन ग्रीन येथील इंडिगो प्रेसमध्ये कर्मचारी असलेला मोहन घोलप हा आपल्या भावाच्या विवाहासाठी कोल्हापूरला गेला होता. कोल्हापूरवरुन तो नुकताच परतला होता आणि कामावर ऋजू झाला होता. तो त्याच्या मित्र निखिल बनसोडे याच्यासोबत कॉटन ग्रीन येथून चेंबुरला निघाला होता. दरम्यान, मुंबई लोकलने प्रवास करताना तो दरवाजात उभा होता. लोकलने वडाळा स्थानक सोडले आणि पुढचे स्थानक येण्यापूर्वी वडाळा पूल ओलांडत असताना मोहन हा रेल्वे रुळावरील खांबाला धडकला. ज्यामुळे तो खाली पडला आणि ही दुर्घटना घडली. (हेही वाचा, कल्याण रेल्वे स्टेशन वर पोलिसाचा गाडीतून पडून मृत्यू)
दरम्यान, मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करताना दरवाजाला लटकणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. अर्थात मुंबई शहरामध्ये वाढलेली गर्दी, त्याचा लोकल सेवांवर पडणारा ताण आणि कोलमडणारी यंत्रणा, या सर्व कारणांचा परिपाक अपघात घडण्यात होतो, असे अभ्यासक सांगतात. आतापर्यंत हजारो प्रवाशांनी मुंबई लोकलने प्रवास करताना आपले प्राण गमावले आहेत. अनेकदा गर्दीच्या वेळी दरवाजात लटकून प्रवास करण्याचा प्रयत्न प्रवासी करतात. तर कधी रेल्व रुळ चुकीच्या पद्धतीने ओलांडताना अपघात घडतात. परिणामी रेल्वे अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण मुंबई शहामध्ये अधिक आहे. त्यातल्या त्यात दिलासादायक बाब अशी की, अज्ञातांकडून धावत्या लोकलवर होणाऱ्या दगडफेकीचे प्रमाण बरेचसे घटले आहे. त्यामुळे जखमी होणाऱ्या आणि मृत्यू होणाचे प्रमाणही घटले आहे. मात्र, रेल्वे अपघातातील मृतांची संख्या अद्यापही लक्षनियच आहे.