
मुंबईकरांच्या आठवड्याची सुरूवात आज वाहतूक कोंडीने झाली आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावर (Western Express Highway) आज सकाळी वाहनांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळाल्या आहेत. अंधेरी (Andheri) जवळ दोन वेगवेगळ्या अपघातांमुळे ही वाहतूक कोंडी झाल्याचं बघायला मिळालं आहे. अंधेरी पूल (सहार) येथे टेम्पो उलटल्याने वाहतूक मंदावली होती तर दुसरीकडे गुंदवली फ्लायओव्हर वर 5-6 गाड्या एकमेकांवर आदळल्याने मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पहायला मिळालं. सकाळच्या वेळी ऐन ऑफिसला जाण्यासाठी बाहेर पडलेल्या अनेक नोकरदारांचा या वाहतूक कोंडीने आठवड्याचा पहिलाच दिवस त्रासात गेला आहे.
अंधेरी पूल (सहार) येथे टेम्पो उलटला
टेम्पो उलटल्याने अंधेरी पूल (सहार) येथे उत्तरेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
Traffic Movement Is Slow At South Bound Due To Tempo Overturn.#MTPTrafficUpdate
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) April 28, 2025
अंधेरीत 5-6 गाड्यांची धडक
Andheri East, Western Express Highway.@RoadsOfMumbai @mumbaitraffic pic.twitter.com/x0B1PPUu1w
— Vivek Gupta (@imvivekgupta) April 28, 2025
दोन अपघातांमुळे बोरिवली कडून अंधेरीला जाणार्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. 5-6 गाड्या एकमेकांवर धडकल्यानंतर झालेल्या अपघातामध्ये जखमींना नजिकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. Mamagoto Restaurant Demolished: हिल रोड रुंदीकरण, वांद्रे येथील मामागोटो रेस्टोरेंट असलेली सात दशके जुनी इमारत पाडली .
अवघ्या 15-20 मिनिटांच्या प्रवासाला आज सकाळी तासाभराचा वेळ लागल्याने अनेकांनी सोशल मीडीयात आपला संताप व्यक्त केला आहे. वाहतूक विभागाने नंतर घटनास्थळावरून अपघातग्रस्त वाहनं तातडीने हलवण्यास सुरू केली.