Mumbai Traffic Update: गोखले पूलाच्या दोन मार्गिका मे 2023 मध्ये होणार खुल्या

मुंबई (Mumbai)  मध्ये अंधेरी पूर्व (Andheri East) आणि पश्चिम भागाला जोडणारा पूल अर्थात गोखले पूल (Gokhle Bridge) 7 नोव्हेंबर पासून वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे उपनगरामध्ये वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. गोखले पूल दोन वर्ष बंद ठेवला जाणार असा अंदाज समोर येत असताना आता या पूलाच्या दोन मार्गिका मे 2023 पर्यंत आणि सप्टेंबर 2023 पर्यंत उर्वरित दोन मार्गिका खुल्या केल्या जातील असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी हा दिलासा आहे. गोखले पूलाच्या डिझाईन वर प्राधान्याने कार्यवाही करत आठवडाभरात आराखडा अंतिम करण्याची विनंती आयआयटी मुंबई ने अमान्य केली आहे.

गोखले पूलाचे टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. त्याचे परीक्षण केल्यानंतर सल्लागारांच्या सल्ला नुसार आणि थेट पाहणीनंतर पूल जीर्ण झाल्याने तो बंद करण्यात आला. आता वाहतूक विभागाने पर्यायी 6 पूलांचा वापर करण्याच्या सूचना केल्या आहेत. सध्या मुंबई उपनगरामध्ये वाहतूक सुरळित ठेवण्यासाठी ट्राफिक पोलिस आणि एमएमआरडीए कडून तातडीने उपाययोजना कराव्यात असे वेलरासू म्हणाले आहेत. नक्की वाचा: Mumbai Traffic Update: मुंबई अंधेरीतील गोखले पूल वाहतुकीसाठी बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग.

 

View this post on Instagram

 

A post shared by My Mumbai My BMC (@my_bmc)

गोखले रेल्वे पुलाचा आराखडा आयआयटी मुंबईकडे फेरतपासणीसाठी देण्यात आला आहे. त्यावर तातडीने कार्यवाही करून आठवडाभरामध्ये तो अंतिम करण्याचे आयआयटीने मान्य केले आहे. अंतिम मंजुरीसह आराखडा प्राप्त होताच त्यापुढील प्रशासकीय कार्यवाही पालिकेच्या पूल विभागामार्फत तातडीने हाती घेण्यात येणार आहे.

सध्या उपनगरामध्ये मेट्रो ची देखील कामं सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळेही कामाच्या वेळेमध्ये आणि संध्याकाळी घरी परतण्याच्या वेळेमध्ये मोठी गर्दी आणि वाहतूक कोंडी पहायला मिळाली आहे.