MMRDA कडून मुंबईमध्ये ईस्टर्न एक्सप्रेस वे (Eastern Express Highway)
वरील जेव्हीएलआर अर्थात जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (Jogeshwari - Vikhroli Link Road) उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या पुलाच्या डागडुजीच्या कामासाठी 13 ते 24 मे दरम्यान हा पूल वाहतूकीसाठी बंद ठेवला जाईल. सध्या देखील काही काम सुरू आहे पण त्यासाठी वाहतूक बंद करण्यात आलेली नाही. मात्र आता 12 दिवस पूल बंद करून वाहतूक इतर मार्गे वळवण्यात आली आहे.
मीडीया रिपोर्ट्सनुसार, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड वर आता कामामुळे वाहतूक वळवण्यात येणार असल्याने वाहतूक कोंडीची शक्यता आहे. सध्या मुंबई उपनगर, पश्चिम उपनगराच्या भागात विविध कामं सुरू असल्याने वाहतूकीच्या अनेक समस्यांना तोंड देत नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. Fact Check: मुंबईत सायन ब्रिज किंवा जेव्हीएलआर जवळ बिबट्या आढळला? जाणून घ्या रवीना टंडनने शेअर केलेल्या या व्हायरल व्हिडिओ मागील सत्य .
सध्या उड्डाणपुलाच्या 200 बेअरींग बदलण्या सोबतच एक्सपान्शन जॉइंट म्हणजेच पूलावर दोन स्पॅनमधील जॉईंट्स बदलण्याचे काम MMRDA कडून तीन महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले आहे. वाहतूक बंद न करता हे काम सुरू आहे. आतापर्यंत 200 पैकी 148 बेअरींग बदलण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. आता एक्सपान्शन जॉइंट बदलण्यासाठी मात्र ब्रीज बंद ठेवला जाणार आहे.